Ticker

6/recent/ticker-posts

झाशीची राणी कुमारी मोक्षा आसेवाड हिचा श्रीराम मित्र मंडळ उमरखेड यांचे कडून सत्कार


बाळासाहेब पवार प्रतिनिधी 

दिनांक 17 सप्टेंबर 2024 रोजी गणपती विसर्जन मिरवणुकी दरम्यान काही समाजकंटकांनी गणेश मूर्तीची तोडफोड करून विटंबना करून हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्यामुळे ढानकी येथील कुमारी मोक्षा माधव आसेवाड हिने आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन बिटरगाव येथे फिर्याद दिली. 

त्यावरून पोलीस स्टेशन बिटरगाव यांनी आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिताचे कलम 298, 189, 189(2), 189(9), 190, 191(1),191(2), 191(3),192,118(1),352,351(3) नुसार अपराध न. 292/2024 नोंद करून आरोपींना अटक केली.  परंतु फिर्यादी मोक्षा हिने तिचे फिर्यादीत आरोपी हातात जोरजोराने तलवारी फिरवत होते असे नमुन केले असतानाही आरोपी विरुद्ध शस्त्र अधिनियम नुसार गुन्हा नोंद केला नसल्यामुळे उपविभागीय पोलिस अधिकारी उमरखेड यांना निवेदन देऊन आरोपी विरूध्द शस्त्र अधिनियम प्रमाणे गुन्हे नोंद करण्याची मागणी केली. 

तसेच आरोपींना जामीन देऊ नये करिता मा. न्यायालयात आक्षेप / हरकत दाखल केली. त्यामुळे श्रीराम मित्र मंडळ उमरखेड यांनी कु. मोक्षा हिस पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. त्यावेळी श्रीराम मित्र मंडळाचे अध्यक्ष ॲड. संजीवकुमार जाधव, संदिप ठाकरे, सुनील टाक, अमोल तिवरगकर, ॲड. अजय पाईकराव, ॲड. फुलारी व इतर सदस्य उपस्थित होते.