डॉ. कळमकर; पुसेगावला श्री सेवागिरी व्याख्यानमाला
बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]
खोट्या प्रतिष्ठेपायी दुःखच वाट्याला येतात, म्हणून आभासी जगात प्रत्येकाने भानावर येऊन वास्तवात जगणे आवश्यक आहे, असे मत प्रसिद्ध विनोदी कथाकार डॉ. संजय कळमकर यांनी केले.
पुसेगाव येथील श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्टच्या वतीने आयोजित श्री सेवागिरी व्याख्यानमालेत 'हसायदान' या विषयावर ते बोलत होते. देवस्थानचे मठाधिपती सुंदरगिरी महाराज, ट्रस्टचे अध्यक्ष रणधीर जाधव, विश्वस्त डॉ. सुरेश जाधव, बाळासाहेब ऊर्फ संतोष जाधव, संतोष वाघ, सचिन देशमुख, गौरव जाधव, ट्रस्टचे माजी पदाधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर व श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. कळमकर म्हणाले, "काळाबरोबर जीवनाभिमुख अभ्यासक्रम राबविण्यात यायला हवा. पुस्तक, वाचनापासून माणूस दूर गेल्यामुळे दुःख वाढत चालले आहे. आनंद सगळीकडे आहे. तो शोधायला हवा. दुःख व्यक्त करण्याच्या सवयीमुळे निराशाच पदरी पडते. आनंद दिल्याने तो वाढतो. समाधानाने जगणे महत्त्वाचे आहे. तरच जीवनातील आनंदाच्या वाटा खुल्या होतील."
रणधीर जाधव यांनी प्रास्ताविक केले. विश्वस्त संतोष जाधव यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. मोहनराव गुरव यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. सुरेश जाधव यांनी आभार मानले.





Social Plugin