बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]
जाखणगाव (ता. खटाव) येथील निस्सीम श्री सेवागिरी भक्त रमेश ऊर्फ बाळासाहेब गाढवे यांनी श्री सेवागिरी चरणी सोन्याचा कळस अर्पण केला. दुपारच्या महाआरतीनंतर देवस्थानाला कळस भेट दिला. त्याचे वजन १७ ग्रॅम २० मिली असून, त्याची सरासरी किंमत एक लाख ५० हजार रुपये आहे.
यावेळी श्री सेवागिरी देवस्थानचे मठाधिपती सुंदरगिरी महाराज, ट्रस्टचे अध्यक्ष रणधीर जाधव, विश्वस्त डॉ. सुरेश जाधव, बाळासाहेब ऊर्फ संतोष जाधव, संतोष वाघ, सचिन
देशमुख, गौरव जाधव, गाढवे कुटुंबीय व भाविक उपस्थित होते. श्री. गाढवे यांच्या पत्नी सुमन यांनी त्यांचा मुलगा संतोष लष्करात भरती झाल्यानंतर तो कळसासारखा सुरक्षितपणे देशसेवा करून पुन्हा माघारी यावा, तुमच्या चरणी सोन्याचा कळस अर्पण करीन, असा श्री सेवागिरी चरणी नवस केला होता.
संतोष हे आपली देशसेवा बजावून सुभेदार पदावरून २०२२ मध्ये निवृत्त झाले. गाढवे कुटुंबीयांनी त्याची परतफेड करत श्री सेवागिरी चरणी सोन्याचा कळस अर्पण केला.





Social Plugin