Ticker

6/recent/ticker-posts

राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्काराने मुख्याध्यापिका पुष्पा गाडेकर सन्मानित


*शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल राष्ट्रभक्ती सेवा गौरव*

अंबड प्रतिनिधी,गणेश सपकाळ

गेल्या अनेक वर्षापासून शैक्षणिक क्षेत्रातील कार्यरत मुख्याध्यापिका सौ.पुष्पा सतीश गाडेकर यांना माणुसकी मल्टीपर्पज फाउंडेशन मलकापूर जिल्हा बुलढाणा यांच्या वतीने सन 2024 मधील राष्ट्रभक्ती सेवा गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते दिनांक 21 सप्टेंबर रोजी मलकापूर येथे दिमाखदार सोहळ्यात त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सामाजिक,शैक्षणिक, विधी, साहित्य,कला, प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

उपक्रमशील व विद्यार्थी प्रिय शिक्षिका म्हणून यांची ओळख आहे. शैक्षणिक क्षेत्रातील रजापूर प्रसिद्ध निर्मलाताई रावसाहेब पाटील दानवे इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल येथे त्या मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहे. त्यांच्या गेल्या अनेक वर्षापासून शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे.

राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित झाल्याबद्दल संस्थापक अध्यक्ष डॉ.गंगाधर पांढरे, श्रीमती आशा पांढरे,प्राचार्य आर.आर वैद्य यांच्यासह पालक वर्गाकडून विशेष अभिनंदन व कौतुक केले जात आहे.