Ticker

6/recent/ticker-posts

विदर्भातील प्रकल्पग्रस्तांना महंत बाबुसिंगजी महाराज यांचा आशिर्वाद



प्रतिनिधी संजय भरदुक महाराष्ट्र ग्रामीण न्यूज

    दि. ९ सप्टेंबर २४ रोजी उपमुख्यमंत्री मा. ना. देवेन्द्रजी फडणवीस साहेब यांच्या शासकीय सागर (मेघदूत) या निवासस्थानी सायंकाळी ६ वाजता महाराष्ट्रातील बंजारा समाजाचे धर्मगुरू, महाराज व बंजारा समाजाच्या वेगवेगळ्या संघटनेच्या पदाधिकारी यांचा मेळावा आयोजित केला होता. त्या मेळाव्यात विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त कृती संघर्ष समिती च्या शिष्टमंडळ यांना आमंत्रित केले होते. 

                        यावेळी मंचावर बंजारा समाजाचे धर्मगुरू महंत बाबुसिंगजी महाराज, व मा. ना. देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री उपस्थित होते. याप्रसंगी प्रथम महंत बाबुसिंगजी महाराज यांचा यथोचित सत्कार ना. फडणवीस साहेब यांनी केला.मेळाव्यास उपमुख्यमंत्री मा. ना. फडणवीस साहेब व महंत बाबुसिंगजी महाराज यांनी संबोधित केले. 

                    यावेळी विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त कृती संघर्ष समिती च्या शिष्टमंडळाला समोर बोलावून पुन्हा एकदा महंत बाबुसिंगजी महाराज यांनी मा. ना. फडणवीस साहेब यांना शिष्टमंडळासमोर विदर्भातील प्रकल्पग्रस्तांच्या समस्या आपल्याला लवकर मार्गी लावाव्या लागतात असे सांगितले असता मा. ना. फडणवीस साहेब यांनी महंतांना सांगितले की, मि आपणास यापूर्वी दिलेला शब्द लवकरच पूर्ण करुन विदर्भातील प्रकल्पग्रस्त शेतकरी यांना न्याय देतो असे शिष्टमंडळा समोर सांगितले.यावेळी भक्तराज महाराज सुद्धा उपस्थित होते. याप्रकारे महंत बाबुसिंगजी महाराज यांनी विदर्भातील प्रकल्पग्रस्त शेतकरी यांना न्याय मिळवून देण्यासाठी ४ वेळा मुंबई ला शिष्टमंडळासोबत येऊन कामाचा पाठपुरावा केला. 

                    यावेळी शिष्टमंडळ यांनी उपमुख्यमंत्री मा. ना. देवेंद्रजी फडणवीस साहेब व बंजारा समाजाचे धर्मगुरू महंत बाबुसिंगजी महाराज पोहरागड यांचे विदर्भातील प्रकल्पग्रस्त शेतकरी यांच्या वतीने आभार मानले. 

          यावेळी समिती शिष्टमंडळ मध्ये विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त कृती संघर्ष समिती चे अध्यक्ष मनोजभाऊ तायडे, विदर्भ कार्याध्यक्ष माणिकराव गंगावणे सर, समिती पदाधिकारी शिवदास पाटील ताठे, संतोषराव भिसडे, रमेश पवार इ. उपस्थित होते.