(प्रतिनिधी राजू पाटील लहाने)
मालेगाव येथील तहसील कार्यालयाजवळ बोरगाव रोडवरील श्री व्यंकटेश सेवा समिती वाशिम द्वारा संचलित बालविकास मंदिर प्राथमिक शाळा मालेगाव येथे शासनाची शिक्षण क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा दोन या अभियानांतर्गत बालविकास मंदिर प्राथमिक शाळेचा मालेगाव तालुक्यातून पुन्हा सलग दुसऱ्या वर्षी प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे व जिल्हा स्तरासाठी पात्र झाली आहे. जिल्ह्यात मालेगाव तालुक्यातून सर्व शाळांनी यामध्ये सहभाग घेतला होता यामध्ये केंद्रस्तर तालुकास्तर, जिल्हास्तर अशी मूल्यांकन समिती गठीत करण्यात येते व शाळेची सर्व
माहिती व रेकॉर्ड यामध्ये तपासली जाते व यानंतर त्या शाळेला गुणांकन देण्यात येते यानुसार बालविकास मंदिर प्राथमिक शाळेचा तालुक्यातून प्रथम क्रमांक आला असून आता ही जिल्हास्तरावर सुद्धा पात्र झाली आहे. मागच्या वर्षी सुद्धा टप्पा एक या अभियानामध्ये शाळेचा तालुक्यातून प्रथम तर जिल्ह्यातून तृतीय क्रमांक आला होता. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा- 2 हे अभियान महाराष्ट्र शासनाचे अत्यंत महत्त्वकांक्षी असे अभियान आहे यामध्ये विविध निकषाद्वारे शाळेला 150 गुणांचे मानांकन देण्यात आले आहे.यानुसार सर्व शाळांना यामध्ये तयारी करावी लागते यामध्ये शाळेची शैक्षणिक गुणवत्ता,विद्यार्थी ऑनलाईन माहिती,आधार, सरल,udise,स्वच्छता मॉनिटर, महावाचन,वाचन कोपरा खेळातील प्रगती,शिक्षकांची शैक्षणिक प्रगती,परसबाग, स्काऊट गाईड,दैनंदिन उपस्थिती,शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी,विद्यार्थ्यांची क्रीडा क्षेत्रातील नैपुण्य,विद्यार्थ्यांचा झालेला कौशल्य विकास, HPC,विद्यांजली पोर्टल,मॉक सर्टिफिकेट,दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या योजना,विविध शिष्यवृत्ती,भारतीय संस्कृती वारसा जतन,वैज्ञानिक दृष्टिकोन,शालेय अभिलेखांचे जतन,माहिती अधिकार लोकसेवा हमी कायदा इत्यादी मुद्द्यांची काटेकोरपणे अभ्यास करून त्याद्वारे सर्व नियोजनबद्ध पद्धतीने अहवाल तयार करून तालुकास्तरीय समितीने व जिल्हास्तरीय समितीने या मुद्द्यांच्या आधारे काटेकोरपणे तपासणी करून शाळेला गुणांकन दिले आहे. तालुकास्तरीय मूल्यांकन मालेगाव पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्री .परांडे साहेब , शिक्षण विस्तार अधिकारी पाटील , बानाइतकर साहेब, महाले सर,श्री कोहळे सर केंद्रप्रमुख गोसावी साहेब,साबीर सर, श्री किशोर बयस सर व श्री. सुरशे सर यांनी केले तर जिल्हास्तरीय मूल्यांकन वाशिम जिल्हा परिषद चे शिक्षणाधिकारी श्री. राजेंद्र शिंदे साहेब,उपशिक्षणाधिकारी श्री गजानन डाबेराव साहेब,भालेराव सर, मनोज अवचार सर यांनी केले. शाळेच्या या संपूर्ण यशासाठी शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल भिसडे यांनी मार्गदर्शन केले व शाळेतील सर्व शिक्षक वृंदांनी अथक परिश्रमासह हे यश संपादन केले.शाळेच्या या यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष ऍड.विजयराव जाधव साहेब व संस्थेतील सर्व पदाधिकारी प्राचार्य,मुख्याध्यापक,शिक्षक वृंदांनी शाळेच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन व कौतुक केले.
सलग दुसऱ्यांदा मिळवलेल्या शाळेच्या या यशाबद्दल पालक वर्ग व परिसरातील मान्यवर यांच्याकडून सुद्धा शाळेचे कौतुक होत आहे.





Social Plugin