Ticker

6/recent/ticker-posts

डॉ. आर. पी .भोसले यांना डी. लिट.पदवी प्राप्त



बुध  दि .[प्रकाश राजेघाटगे ] 

पुसेगाव येथील कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. आर .पी. भोसले यांना युनिव्हर्सिटी ऑफ सेंट्रल अमेरिका येथील बोलिव्हिया विद्यापीठाने डी .लिट.पदवी देऊन सन्मानित केले आहे. डॉ.भोसले यांचे पदवी व पदव्युत्तर शिक्षण रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेजच्या ' कमवा व शिका ' योजनेमधून पूर्ण केले आहे. त्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या विविध महाविद्यालयात हिंदी विषयाचे अध्यापन कार्य तीस वर्षे व पदव्युत्तर अध्यापनाचा अनुभव तेरा वर्षाचा आहे. संस्थेच्या सावळज, पाचवड ,पंढरपूर, सातारा, पुसेगाव येथील महाविद्यालयात अध्यापनाचे कार्य केले आहे. त्यांनी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी यांच्या माध्यमातून सहा वर्ष सामाजिक कार्य केले आहे. तसेच चेअरमन हिंदी अभ्यास मंडळ, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या विविध कमिटीवर कामकाज केले आहे. त्यांना रयत शिक्षण संस्थेने प्राचार्य एम. एम. स्वामी पुरस्कृत बॅरि.पी. जी. पाटील पुरस्काराने सन २०१५ मध्ये सन्मानित केले आहे. ते हिंदी विषय तज्ज्ञ, संशोधन पेपरचे वाचन विविध चर्चासत्रातून केले असून ते सर्व विविध मौलिक अंकातून प्रसिद्ध झालेले आहे. त्यांनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चर्चासत्रामध्ये सहभाग घेतला आहे शिवाजी विद्यापीठाने एम .फिल.पदवी सन  १९९७ व पीएच.डी २००५ मध्ये पदवी प्रदान केली आहे. रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन मा. चंद्रकांत दळवी साहेब, संघटक डॉ अनिल पाटील, सचिव मा. विकास देशमुख, सहसचिव (उच्च शिक्षण) प्रिं. डॉ. शिवलिंग मेनकुदळे,

सहसचिव आॅडिट प्रिं. डॉ.राजेंद्र मोरे, सहसचिव (माध्यमिक विभाग) मा. श्री. बंडू पवार, तसेच कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या विकास समितीतील सर्व सदस्य, प्राध्यापक, शिक्षकेत्तर सेवक, आजी-माजी विद्यार्थी यांनी अभिनंदन केले.