प्रतिनिधी-केडीबी
पुष्पावती विद्यालय डिंगोरे या शाळेत 29 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात आला यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री अकोलकर प्रतिक श्री गाढवे जगन्नाथ श्री बागुल रतिलाल श्री पाटील दिनकर श्री डुंबरे मंगेश श्री काकडे विजय सौ.भालेराव शिंदे सौ.साधना तांबे उपस्थित होते
यावेळी राष्ट्रीय दिनानिमित्त श्री विजय काकडे यांनी सांगितले की आपल्या भारतात 29 ऑगस्ट हा दिवस क्रीडा दिन म्हणून दरवर्षी साजरा केला जातो .हा दिवस हॉकीचे जादूगर म्हणून ओळखले जाणारे मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो ध्यानचंद यांनी आपल्या देशाला हॉकी खेळात ऑलिंपिकचे सुवर्णपदक मिळवून देण्याची अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. राष्ट्रीय दिनानिमित्त देशाचे राष्ट्रपती हे या दिवशी क्रीडा क्षेत्रातील योगदान देणाऱ्या खेळाडूंचा गौरव करतात. त्यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार दिला जातो. खेळामुळे लोकांची शरीरे तंदुरुस्त राहते तसेच देशांमध्ये एकता व बंधुता वाढीस लागते . यावेळी सर्व विद्यार्थ्यांना खेळाचे महत्व सांगितले तसेच शाळेत खो-खो, कबड्डी खेळाच्या स्पर्धा घेऊन राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला. त्यावेळी श्री घोलप यांनी सर्वांच्या आभार मानले





Social Plugin