बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]
पुसेगाव ता . खटाव येथील श्री सेवागिरी विद्यालयात कला महोत्सव अंतर्गत पर्यावरण पूरक गणेश मूर्ती कार्यशाळा घेण्यात आली. कालाशिक्षिका सौ. फाळके एस. डी. यांच्या नियोजना खाली कला महोत्सव अंतर्गत पर्यावरण पूरक गणेश मूर्ती कार्यशाळा घेण्यात आली मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा . सुप्त कलागुणांना वाव मिळावा. या दृष्टिकोनातून शाळेमध्ये ही कार्यशाळा संपन्न झाली .
यामध्ये 230 विद्यार्थी सहभागी झाले होते. यासाठी शिल्पकार श्री अशोक हनुमंत कुंभार यांनी अनमोल असे मार्गदर्शन केले. मुलांनी त्यांच्या अनमोल चिमुकल्या हाताने गणपतीची विविध रूपे साकारली. यासाठी रयत शिक्षण संस्थेचे सहाय्यक विभागीय अधिकारी श्री दाभाडे सर, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, स्थानिक स्कूल समिती, शाळा व्यवस्थापन समिती, गुरुकुल विभाग, माता पालक संघ शिक्षक पालक संघ व शाळेतील सर्व शिक्षक व सेवक वर्ग यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. शाळेत नेहमी च विविध उपक्रम घेतले जातात.





Social Plugin