Ticker

6/recent/ticker-posts

श्री नागनाथ विद्यामंदिर बुध मध्ये शैक्षणिक साहित्याचे किट वाटप . . .



बुध   दि .[प्रकाश राजेघाटगे ]

 सेवा सहयोग मुंबई , दुर्गवीर प्रतिष्ठान मुंबई व अक्षौहिनी बिझनेस कन्सल्टन्सी प्रा लि . सातारा यांच्या वतीने श्री अमित प्रकाश बोडके संस्थापक , मॅनेजिंग डायरेक्टर अक्षौहिनी बिझनेस कन्सल्टन्सी प्रा . ली . सातारा व सौ . स्मिता गोडसे - सुर्यवंशी युवा उद्योजिका विद्यालयाचे  माजी विद्यार्थी यांनी श्री नागनाथ विद्यालय बुध मधील विद्यार्थी यांना शैक्षणिक साहित्यांचे किटचे वाटप मान्यवरांचे हस्ते करण्यात आले . या किटमध्ये स्कूल बॅग , कंपासपेटी , फुलस्केप च्या वहया व इतर साहित्य चा समावेश आहे .किटची किंमत 750 रु आहे . इ 5वी ते 10वी पर्यंतच्या 55 विद्यार्थी याना शैक्षणिक साहित्याचे किटचे वाटप मान्यावरांच्या हस्ते करण्यात आले 

यावेळी  सुजता बोराटे सरपंच ,अभयराजे घाटगे उपसरपंच व जिल्हानियोजन समितीचे सदस्य , माजी प्राचार्य के .डी . पवार , जीवन ( काका ) इंगळे , इनामदार गुरुजी , अमित बोडके , स्मिता गोडसे - सुर्यवंशी , प्रितम गोडसे व विद्यालयाचे प्राचार्य अंकुश भांगरे यांच्या हस्ते संपन्न झाले . यावेळी प्राचार्य अंकुश भांगरे , सहशिक्षीका सविता भांगरे व प्राजक्ता इंगळे यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला . अमित बोडके यांनी आपल्या मनोगतामध्ये संस्था करीत असले काम व संस्थेचा उद्देश सांगितला . शिवाजी महाराजनी जिंकलेल्या गड किल्यांचे जतन व संवर्धन करण्याचे काम संस्थेच्या माध्यमातून केले जाते व विद्यालयाचा माजी विद्यार्थी म्हणून कृतज्ञता म्हणुन विद्यार्थी यांना शैक्षणिक साहित्यांची किट दिली आहे असे  स्पष्ट केले . 

माजी प्राचार्य के .डी पवार सर यांनी अमित बोडके अक्षौहिनी बिझनेस कन्सल्टन्सी प्रा . ली . संस्थेच्या माध्यमातून करत असलेले काम कौतुकास्पद आहे व आपण ज्या शाळेतून घडलो आहोत तेथील विद्यार्थी व शाळेसाठी मदतीचा हात विद्यार्थ्यांना देत आहे आनंदाची व समाधानाची गोष्ट आहे तसेच विद्यार्थी यानी अमित बोडके यांचा आदर्श घेऊन भविष्यात तुम्ही विद्यार्थी यांनी विद्यालयातील विद्यार्थी व शाळेसाठी मदत करण्याचे आव्हान केले . या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन भगवान सरवदे यांनी केले तर आभार नाना दडस यांनी मानले यावेळी विद्यालयाती विद्यार्थी यांचा वाढदिवस मान्यवरांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन केला यावेळी विद्यालयातील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते .