Ticker

6/recent/ticker-posts

ललगुण येथील "नाणी नाना चषक " स्पर्धेत बिजवडी संघ सर्व प्रथम.



बुध  दि .[प्रकाश राजेघाटगे] 

ललगुण ता . खटाव येथे कै. सरुबाई शंकर अडसूळ यांचे प्रथम स्मृति दिनानिमित्त अडसूळ परिवारातर्फे कीर्तन व व्हॉलीबॉलचे सामने आयोजित करण्यात आले होते. सकाळी 10 ते 12 ह. भ. प. डॉ. अक्षयदास महाराज यांचे सुश्राव्य अशी कीर्तन सेवा संपन्न झाली व स्पर्धेचे उद्घाटन श्री संपत ,अशोक व  विलास  अडसूळ  यांचे हस्ते  झाले . अणि रात्री 10 ते सकाळी 5.50 पर्यंत व्हॉलीबॉलचे सामने पार पडले

 अंतिम सामना बिजवडी व नीरा या दोन संघामध्ये झाला यामधे बिजवडी  संघ विजयी झाला.बक्षिस वितरण समारंभ प्रकाश  व मानाजी  अडसूळ यांच्या हस्ते झाला. या स्पर्धा पार पाडण्यासाठी डायमंड  क्लब, रॉयल अॅकडमी, अणि ललगुण ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले .