बातमी का छापली म्हणतं पत्रकारास जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या मुरुम माफियावर पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा असे निवेदन अंबड तालुका मराठी संघाच्या वतीने पोलीस निरीक्षक,पोलीस उपविभागीय अधिकारी अंबड याना देण्यात आले.
अंबड प्रतिनिधी, गणेश सपकाळ
अंबड येथील पत्रकार शेख फारुक यांनी अवैधरित्या गौण खनिज मुरुम उत्खननाच्या संदर्भात दैनिक समर्थ राजयोग वृत्तपत्रात बातमी का छापली म्हणून याचा मनात राग धरून पत्रकार शेख फारुक यांना मुरुम माफिया अक्रम युसूफ बागवान याने अंबड तहसील कार्यालयाच्या आवारात अडवून तु जास्तच माजला म्हणतं गलिच्छ भाषेत शिवीगाळ व धक्काबुक्की करत माझ्या नादी लागला तर तुला जीवंत ठेवणार नाही अशी धमकी देत मुरुम माफिया अक्रम युसूफ बागवान याने अज्ञात व्यक्तीला फोन करून हा पत्रकार कोठेही दिसल्यास याचे हातपाय तोडून जीवेच मारुन टाका पुढे जे काही काय होईल ते बघून घेऊ, अशा जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. पत्रकार शेख फारुक दैनिक समर्थ राजयोग वृत्तपत्रात अवैधरित्या गौण खनिज मुरुम उत्खननाच्या चाललेल्या गोरखधंद्याची बातमी छापूल्यामुळे मुरुमाची अवैधरित्या उत्खनन चौकशी संदर्भात पत्रकार शेख फारुक यांनी सदरील बातमी दि.११ सप्टेंबर रोजी वृत्तपत्रात बातमी प्रकाशित केली.
त्याची मा.जिल्हाधिकारी जालना यांना दि.०१/०८/२०२४ रोजी संबंधित विषयाची चौकशी संदर्भात तक्रार अर्ज दिला होता.सदरील बातमी प्रकाशित करुन बराचसा कालावधी झाला असतानाही मुरुम माफिया अक्रम युसूफ बागवान याने मनात राग धरून पत्रकार शेख फारुक यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करून हातपाय तोडून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्यामुळे पत्रकार शेख फारुक यांनी अंबड पोलीस स्टेशन मध्ये तक्रार केली असुन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अंबड पत्रकार संघाने त्यांच्यावर पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी करून गुन्हेगाराला अटक करण्याची मागणी केली असून निवेदनावर अंबड तालुका मराठी संघाचे तालुकाध्यक्ष संतोष जिगे , शिवाजी मस्के, गीताराम मते, अशोक शहा, सिद्धेश्वर उबाळे, सोहेल चाऊस, रामभाऊ लांडे, जहीर शेख, मारोती सावंत,धर्मराज बाबर, अशोक गाढे ,सुरेश खरात, गोविंद खरात, अजहर शेख रफिक शेख, इम्रान पठाण, रफिक शेख गजानन पुरी,विष्णू सोनवणे, नाजीम सय्यद, रामेश्वर आदलिंगे, आकाश जळके अनिल भालेकर, श्रीधर कापसे, आदी पत्रकार बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.





Social Plugin