Ticker

6/recent/ticker-posts

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शासन निर्णयाची होळी



बंडु शिंगटे घुंगर्डे हादगाव

    सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीच्या अनुदानातून जालना जिल्ह्याला वगळण्यात आल्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने नुकसानग्रस्त पिकाच्या बांधावर शासन निर्णयाची होळी करत निषेध करण्यात आला.एक व दोन सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील सर्वच महसूल मंडळांमध्ये मुसळधार अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले होते.तसेच फळ पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे डाळिंब, मोसंबी व द्राक्ष बागांचे मोठे नुकसान यात झालेल्या असताना शासनाच्या अनुदानापासून जिल्ह्यातील शेतकरी वंचित राहत आहेत.. 4 ऑक्टोंबर महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयात 997 कोटी रुपयांची मदत अतिवृष्टी व पूरग्रस्त शेतकऱ्यांना देण्यात आली. मात्र यात जालना जिल्ह्याचा समावेश नसल्याने शेतकरी संताप व्यक्त करत आहेत.

    वडीगोद्री येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने नुकसानग्रस्त शेत पिकांच्या बांधावर  या शासन निर्णयाची होळी करत निषेध व्यक्त करण्यात आला. या सरकारच करायचं काय,खाली मुटके वर पाय.जिल्ह्याला अतिवृष्टी अनुदानातून वगळणाऱ्या जिल्हा प्रशासनाचा धिक्कार असो, शेतकरी एकजुटीचा विजय असो, जय जवान जय किसान अशा शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत हे आंदोलन करण्यात आले..

  यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष सुरेश काळे, सुनील गायकवाड, बप्पासाहेब काळे,अंकुश तारख, बाबासाहेब दखणे, नारायण डहाळे,प्रकाश सुरासे,मुकेश डूचे आदींची उपस्थिती होती..

 One attachment  •  Scanned by Gmail