Ticker

6/recent/ticker-posts

लोकशाही चा जागर मेळावा थाटामाटात संपन्न



प्रतिनिधी--संजय भरदुक मंपीर

मंगरूळपीर--दिंनाक १० आक्टोबर ला सायंकाळी ७ वाजता मंगरूळपीर शहरांमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरामध्ये संभाजी ब्रिगेड मंगरूळपीर च्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात जागर लोकशाहीचा, विचार स्वराजचा या विषयावर खालील मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन संभाजी ब्रिगेड मंगरूळपीर च्या पदाधिकारी यांनी मान्यवरांचे स्वागत केले

 कार्यक्रमांचे उद्घाटक शिवश्री सौरभदादा खेडेकर, प्रमुख वक्ते शिवश्री डॉ .प्रा.शिवानंद भानुसे, कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवश्री गजानन भाऊ भोयर विभागीयध्क्ष, प्रमुख अतिथी शिवश्री डॉ सिध्दार्थ देवळे, संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष शिवश्री गणेश सुर्वे, शिवश्री सचिनभाऊ परळीकर तसेच कॄषिभुषण पुरस्कार प्राप्त शिवश्री दिलीपभाऊ फुके हे व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवश्री प्रा.महेश देवळे यांनी केले प्रास्ताविक शिवश्री भास्कर जिवणे सर यांनी केले . 

मान्यवर यांनी यथोचित असे आप आपले विचार व्यक्त करताना वास्तविक वर्तमान काळातील जल्वंत प्रश्नांसाठी सरकार चे लक्ष नाही सरकार च्या डोक्यात फक्त सत्ता कशी काबीज करावी हे असून शेतकऱ्यांना मालाला भाव नाही, बेरोजगार तरुणांना नोकऱ्या व रोजगार चा प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जाते.अशी अनेक प्रश्न समस्या उभ्या राहतात ते करण्याची मानसिकता नाही.अश्या अनेक प्रश्नांना वाचा फोडली.या कार्यक्रमला सर्व शिवश्री गजानन व्यवहारे, रमेश मुंजे, काझी अझरूद्दीन, वसंतराव मोरे, श्रीकृष्ण भरदुक, राधेश्याम शिरसाट, श्रीकृष्ण शिंदे, गजानन खंदारे, नानाभाऊ ठाकरे,यांनी यशस्वीरीत्या कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित होती..शेवटी आभार शिवश्री बंडू भाऊ भगत यांनी केले.