Ticker

6/recent/ticker-posts

तथागत फाउंडेशन या सामाजिक संस्थेचे उद् घाटन



अजय माळवे @ ठाणे प्रतिनिधी )

आज दिनांक २९/९/२०२४ रोजी तथागत फाउंडेशन या ट्रस्टचे उद् घाटन संपन्न झाले , सदर उद् घाटन डॉ निलीमा पाटील व विष्णू नगर मधील महीला कार्यकर्ते  पुष्पाताई कांबळे , देशमाने ताई, अंजली ताई गायकवाड, व इतर महीला यांच्या हस्ते करण्यात आले, संस्थेच्या उद् घाटन प्रसंगी हेल्थ चेक अप ठेवण्यात आले होते, यात रक्तदाब, सुगर चेक , योगा ,नाडी परीक्षण , महीला समस्या मोफत करण्यात आले, उन्नती हेल्थ केअर या संस्थेने सहकार्य केले, या चेक अप चा विभागातील नागरीकांनी उस्फुर्त पणे सहभाग घेवून हेल्थ चेक अप किती महत्त्वाचे आहे असा अभिप्राय दिला, या सर्व कार्यक्रमाचे आयोजन करणारे तथागत फाउंडेशन चे सर्व पदाधिकारी यांनी अथक परिश्रम घेतले व कार्य क्रम संपन्न केला .

धन्यवाद  , संस्थेचे अध्यक्ष संजय गायकवाड व उपाध्यक्ष सिद्धांत शेजवळ यांनी संस्था शिखरावर कशी पोहचेल याबाबत माहिती दिली, संस्थेचे सचिव अजय यशवर्धन यांनी संस्थेच्या ध्येय व धोरणे स्पष्ट करून संस्था लोककल्याणासाठी कार्य करेल , असे ठामपणे सांगितले, व ईतर पदाधिकारी खजिनदार रणजित आवडे, राहुल देशमाने, रुपचंद कांबळे , आस्वजित वाघमारे, अनिल कांबळे, रुपेश दिवे यांनी कार्यक्रमाची धुरा सांभाळली