बंडु शिंगटे घुंगर्डे हादगाव
अंबड तालुक्यातील घुंगर्डे हादगाव येथील ऊषा ईश्वर कोळेकर यांची घुंगर्डे हादगाव येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षीका म्हणून नियुक्ती करण्यात आली. ही निवड कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालय व मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जालना जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी यांच्या मार्फत ही निवड करण्यात आली.
उषा ईश्वर कोळेकर यांची जिल्हा परिषद शिक्षिका म्हणून निवड केल्याबद्दल घुंगर्डे हादगाव येथील ग्रामस्थांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला व त्यांना हार्दिक शुभेच्छा देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी सरपंच भरत काळे, शाळेचे मुख्याध्यापक धोंडगे सर, हेलवडे सर, वैभव पवार सर, डी एल पवार सर, उगले सर, चव्हाण मॅडम तसेच ग्रामस्थ ईश्वर कोळेकर, बाबा हराळे, विशाल पवार, गजू पवार, सखाराम वरकड, जालिंदर पवार, गोविंद कोळेकर, माऊली दोबाले, अनिल भाऊ मस्के, डॉ राजेंद्र चोरमले सह आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.





Social Plugin