Ticker

6/recent/ticker-posts

कोरेगाव विधानसभा निवडणूक मशाल या चिन्हावरच लढण्याचा ठराव



बुध  दि .[प्रकाश राजेघाटगे ]  

कोरेगाव विधानसभा मतदार संघातील  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पुसेगाव येथील बैठकीत  सर्व पदाधिकाऱ्यांनी व  उपस्थित कार्यकर्त्यांनी  मशाल चिन्हावरच   विधानसभा  निवडणूक   लढविण्याचा ठराव केला . यावेळी कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी आक्रमक भूमिका घेतली .                

     यावेळी युवा नेते प्रताप जाधव ,शिवसेना उपजिल्हाप्रमुख दत्ता नलवडे, तालुकाप्रमुख सचिन झांजुर्णे, सातारा तालुकाप्रमुख रमेश बोराटे, खटाव तालुकाप्रमुख संजय नांगरे ,शेत्र प्रमुख भानुदास  कोरडे सर, कोरेगाव शहर प्रमुख अक्षय बर्गे ,महिला जिल्हा संघटिका सलमा शेख, कोरेगाव तालुकाप्रमुख उज्वलाताई भोसले,  तालुका प्रमुख सुमित्र शेडगे, विभाग प्रमुख आस्लम शेख, शहर प्रमुख आकाश जाधव, यशवंत जाधव ,अर्जुन मोहिते ,उप तालुकाप्रमुख आमीन आगा , मुगटराव कदम ,महिपत नाना डंगारे, अजित पाटेकर, व मोठ्या संख्येने कार्यकर्ते , पदाधिकारी या बैठकीस उपस्थित होते .        

   पुसेगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पुतळ्यास अभिवादन करून फटाक्याची आतीषबाजी करण्यात आली . बैठकीस कोरेगाव मतदारसंघातील सर्व पदाधिकारी व ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी आपल्या भूमिका मांडल्या .  हा  मतदार संघ शिवसेनेचा आहे . त्यामुळे गेल्या विधानसभा निवडणूकीत आमदार महेश शिंदे यांनी शिवसेनेत प्रवेश करून धनुष्यबाणावर निवडणूक लढवून विजयी झाले . लोकसभा  निवडणुकात शिवसेनेच्या कार्यकर्त्याना व पदाधिकाऱ्यांना मान सन्मान  मिळत नाही . शिवसेनेला गृहीत धरले जाते . त्यामुळे  संघटनेचे होत असलेली नुकसान या संदर्भात सर्व पदाधिकारी  यांनी खंत व्यक्त केली .येणाऱ्या काळात शिवसेनेचे मजबूत संघटन करणे व येणाऱ्या सर्व निवडणुकीत मशाल चिन्हावरच  निवडणूक लढल्या जाव्यात असा ठराव या बैठकीत करण्यात आला . सर्व नेत्यांनी आपल्या भाषणात या विषयावर अग्रक्रमाने आपले विचार मांडले . प्रताप जाधव यांनी ठराव मांडल्यानंतर उपस्थित  सर्वांनी आपापले मोबाईल टॉर्च लावून याला समर्थन देण्यात आले .येणाऱ्या  दोन दिवसात पक्षाचे सचिव विनायक राऊत यांची कोरेगाव विधानसभेतील शिष्टमंडळ भेटीला  जाणार असून  आपली भूमिका पक्षश्रेष्ठीजवळ ठामपणे मांडणार आहेत . बैठकीचे सूत्रसंचालन संघटनेचे निष्ठावंत कार्यकर्ते  अशोक जी भोसले यांनी केले .