प्रतिनिधी--संजय भरदुक मंपीर
मंगरूळपीर --आज दि.१४ ऑक्टोबर रोजी विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त कृती संघर्ष समिती वाशीम च्या वारा जहाॅ.ता. वाशीम च्या शाखेचे अनावरण, डिगांबरजी खोरणे जि.प.सदस्य वाशीम , समिती जिल्हा उपाध्यक्ष शिवदास पाटील ताठे, समिती पदाधिकारी संजय भरदूक,देविदासजी गंगावणे,यांच्या उपस्थितीत माणिकराव गंगावणे सर जिल्हाध्यक्ष तथा विभागीय कार्याध्यक्ष यांच्या हस्ते सायंकाळी ६ वाजता संपन्न झाले.
यावेळी राजुभाऊ तिवारी, भगवान माऊली, विठ्ठलराव गंगावणे, बबन जाधव, विश्वनाथ वारेकर, प्रल्हाद वारेकर, राजु सुरडकर, गजानन लाळगे इ. उपस्थित होते. बळीराजा प्रकल्पग्रस्त कृती संघर्ष समिती शाखा वारा जहाॅ. शाखा पदाधिकारी,
शाखा अध्यक्ष - ज्ञानेश्वर खोरणे ,उपाध्यक्ष - भिमराव हमाने, सचिव - राजू खोरणे,कोषाध्यक्ष - गजानन नागुलकरसदस्य - अशोक हमाने, भारत खोरणे, गजानन शिंदे, डिगांबर खोलगाडे, किसन मिटकरी, बाबुराव शिंदे.
- यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. त्यानंतर समिती अध्यक्ष व पदाधिकारी यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी विदर्भ कार्याध्यक्ष माणिकराव गंगावणे सर यांनी सखोल माहिती दिली. यापुढे संघटनेच्या लढ्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मदन हमाने सर यांनी केले. . शाखा अनावरण कार्यक्रम जि. प. सदस्य डिगांबरजी खोरणे व सहकारी यांनी पार पाडला. यावेळी बळीराजा प्रकल्पग्रस्त कृती संघर्ष समिती वारा (जहाॅ) येथील प्रकल्पग्रस्त शेतकरी बंधू, भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.





Social Plugin