बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]
पुसेगाव बाजारपेठेत ता. 8 मार्च २०२३ ला झालेल्या भांडणातील आरोपी सोमनाथ आप्पाजी बुधावले (रा. बुधावलेवाडी, विसापूर) यास वडूज येथील प्रथम वर्ग न्यायालयाने दोन वर्षे चार महिन्यांची सश्रम कारावासाची शिक्षा आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.याबाबत पुसेगाव पोलिस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुसेगाव येथील सिद्धेश्वर ट्रेडर्ससमोर सोमनाथ बुधावले हा त्याच्या मित्रांसोबत भांडण करत होता, म्हणून दुकानातील यशराज जाधव भांडण सोडविण्यासाठी गेला असता त्यास लाकडी दांडक्याने मारहाण करून शिवीगाळ व धमकी देण्यात आली होती.
रामचंद्र जाधव यांनी याबाबत पुसेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. सहायक फौजदार दीपक बर्गे यांनी सदर गुन्ह्याचा तपास करून वडूज येथील प्रथम वर्ग न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. न्यायमूर्ती शितोळे यांच्या न्यायालयाने निकाल देताना आरोपी बुधावले यास दोन वर्षे चार महिने सश्रम कारावास आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. पोलिस प्रॉसिक्यूटर म्हणून आर. व्ही. साळुंखे, कोर्ट पैरवी म्हणून दत्तात्रय जाधव, रेखा खाडे यांनी काम पाहिले.





Social Plugin