Ticker

6/recent/ticker-posts

विध्यार्थीनी मिळालेल्या संधीचे सोने करावे – मा. प्रा सुरेश साळुंखे



बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]

“ चंद्रकांत दळवी साहेब यांचे मार्गदर्शनाखाली विद्यालयाने निर्माण केलेल्या आधुनिक सुविधांमुळे मिळालेल्या संधीचे विद्यार्थ्यांनी सोने करावे”, असे प्रतिपादन दहिवडी कॉलेज दहिवडी येथील प्राचार्य सुरेश साळुंखे यांनी केले. हनुमान विद्यालय निढळ येथे 137 वा कर्मवीर जयंती सोहळा कार्यक्रमांमध्ये अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. ते बोलताना पुढे म्हणाले की विद्यार्थ्यांनी शिक्षणामध्ये उच्च गुणवत्ता प्राप्त करावी. यावेळी महाविद्यालयीन शिक्षण व त्याचे महत्त्व त्यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले.

प्रारंभी कर्मवीर अण्णा व रयत माऊली लक्ष्मीबाई पाटील यांचे प्रतिमापूजन करून ईशस्तवन व स्वागत पद्यांनी कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.  विद्यालयाचे मुख्याध्यापक जगदीश निर्मळ यांनी प्रास्ताविकातून विद्यालयाच्या स्थापनेपासून विद्यालयाच्या प्रगतीचा चढता आलेख सांगून विद्यालयामध्ये सुरू असलेल्या विविध उपक्रम व प्रकल्पाची माहिती सादर केली. रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन माननीय चंद्रकांत दळवी यांचे मार्गदर्शनाखाली विद्यालयाची उत्कृष्ट वाटचाल सुरू असल्याचे सांगून सर्व प्रमुख अतिथींचा परिचय करून उपस्थितांचे शाल श्रीफळ व बुके देऊन स्वागत केले. विद्यार्थ्यांचे वतीने अरबाज मणेर व कुमारी श्रेया साळुंखे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी विद्यालयातील यशवंत गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांचे शुभहस्ते पारितोषिके देण्यात आली. 

डोंगरशेत प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक विजय गुरव आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, “या विद्यालयातून सुसंस्कारित, चांगले विद्यार्थी घडावेत याचा प्रत्येकाला अभिमान वाटावा या दृष्टीने विद्यार्थ्यांनी जीवनामध्ये आपली वाटचाल करावी.” 

          कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य .सुभाष सस्ते बोलताना म्हणाले की, “विद्यार्थ्यांनी जीवनामध्ये नेहमी उच्च ध्येय ठेवावे व त्या दिशेने योग्य मार्गक्रमण करावे. कर्मवीर अण्णांनी दूरदृष्टी ठेवून शिक्षण रुपी ज्ञानगंगा रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून खेड्यापाड्यातील झोपडी पर्यंत पोहोचवली. शिक्षणामुळे माणूस घडतो. विद्यार्थ्यांनी उच्च ध्येय, जिद्द, चिकाटी ठेवून योग्य अभ्यास केल्यास यश निश्चित मिळते. तुम्ही ज्या क्षेत्रात जाल तिथे सर्वोत्कृष्ट बना”, असा संदेश यांनी विद्यार्थ्यांना दिला.  

          कार्यक्रमासाठी विद्यालयाचे माजी पर्यवेक्षक  आर व्हि घाडगे,,मुख्याध्यापक ए. बी. सावंत, सोपानराव गायकवाड, भुजबळ गुरुजी, एन. के. जाधव, हणमंतराव सुतार, स्कूल कमिटी सदस्य संतोष खुस्पे, प्रशांत घाडगे,विलास कुलकर्णी, सर्व समित्यांचे पदाधिकारी ग्रामस्थ, पालक, शिक्षक सेवक  विद्यार्थी उपस्थित होते. कांबळे एस. एन व सौ.गायकवाड ए. ए यांनी सूत्रसंचालन केले. उपशिक्षक जाधव आर.एन यांनी आभार मानले.