गुणवंत राठोड कारंजा प्रतिनिधी
कारंजा : आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे व स्व. आशादेवी चव्हाण बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, ६ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते ३ या वेळेत स्थानिक महेश भवन येथे मोफत सर्व रोगनिदान, उपचार आणि मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
शिबिरात मेडिसीन तज्ञ , सर्जरीतज्ञ, स्त्री रोग तज्ञ, दंत मूखरोग तज्ञ, कर्करोग तज्ञ, कान-नाक-घसा तज्ञ, नेत्र रोग तज्ञ, अस्थिरोग तज्ञ, त्वचा रोग तज्ञ, बालरोग तज्ञ, श्वसन रोग तज्ञ, तथा न्यूरोसर्जन तज्ञ सहभागी होऊन विविध प्रकारच्या आजारांवर उपचार तथा गरजेनुसार त्यांची मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. शिबिर स्थळावर रुग्णांची नोंदणी केली जाणार आहे. शिबिरानंतर भरती रुग्णांची व्यवस्था करण्यातयेईल
यावेळी शिबिराचा लाभ घेण्याचे डॉ. महेश चव्हाण यांचे आवाहन यामध्ये एक्स-रे, रक्त, लघवी तपासणी, सोनोग्राफी मोफत केली जाणार आहे. भरती रुग्णांना राहण्याची व जेवण मोफत मिळेल. अतिविशिष्ट चाचण्या जसे सिटीस्कॅन, एमआरआय आवश्यकतेनुसार मोफत होईल.फाटलेले ओठ, दुभंगलेले ओठ, टाळू तसेच जन्मता असलेली मुखविकृती, गुडघे व कंबरेच्या सांध्याचे प्रत्यारोपण, मोतीबिंदू, हायड्रोसिल हर्निया आदी शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहे. शिबिरामध्ये येताना आधार कार्ड व राशनकार्ड सोबत आणावे आणि बहुसंख्येने या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन अस्थिरोग तज्ञ आयोजक डॉ. महेशचव्हाण व त्यांच्या कारंजा मानोरा येथील मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.





Social Plugin