( प्रतिनिधी )ईश्वर पवार
08 ऑक्टोंबर 2024 रोजी आसेगाव सर्कलचे विविध विकास कामाचे भूमिपूजन, उद्घाटन जि.प.अध्यक्ष वाशीम श्री.चंद्रकांतदादा ठाकरे यांच्या शुभहस्ते संपन्न कुंभी,वसंतवाडी येथे काँक्रीट रस्ता कामांचे भूमिपूजन करताना यावेळी जि.प अध्यक्ष ठाकरे म्हणाले की वसंतवाडी गावाच्या सर्वांगीण विकासाकरिता सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांना माझे सदैव सहकार्य राहील येणाऱ्या काळातही सरपंच यांनी केलेल्या विविध प्रस्तावित कामांना गती देऊन पाठपुरावा करून गावकऱ्यांचे सहकार्य लाभल्यास गावाचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही असे विश्वास व्यक्त केले
दरम्यान वसंतवाडी गावामध्ये प्रथमता अग्निवीर म्हणून निवड झालेल्या विवेक इंदल राठोड यांचा सत्कारही अध्यक्ष चंद्रकांतदादा ठाकरे यांनी करून विवेक यांचे कौतुक केले यावेळी प.स. सभापती. रेखाताई साहेबराव भगत. उप सभापती. अरुणाताई ज्योतीराम राठोड. जि.प.सदस्य मा.ना. आर.के.राठोड..मं. पं.समितीचे माजी सभापती मा.ना. भास्कर पाटील शेगीकर. माजी सभापती. प्रतिभाताई म्हहले. पंचायत समिती सदस्य.श्री अनंतकुमार शेळके. विविध प्रमुख मान्यवर मंडळी सह कार्यतत्पर सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व गावकरी मंडळी यांची विशेष उपस्थिती होती.
.jpg)




Social Plugin