Ticker

6/recent/ticker-posts

पिंपळगाव तर्फे नारायणगाव येथील मळ्यात श्री गोपीनाथ बोर्हाडे यांचे राहते घर आगित भस्मसात



 प्रतिनिधी -किसन भुतांबरे ओतूर 

जुन्नर तालुक्यातील नारायणगाव जवळील पिंपळगाव तर्फे नारायणगाव येथील मळ्यात शेती करणारे श्री गोपीनाथ बोर्हाडे हे व त्यांचे कुटुंब दिनांक 14 -10 -2024 रोजी कामानिमित्ताने बाहेर गेले होते. दुपारच्या वेळी घरातील विजेच्या शॉर्टसर्किटमुळे घराला आग लागली यावेळी घराजवळ कोणी नसल्याने आग विझवण्यास यश आले नाही. घरामध्ये सर्वांचे वापरायचे कपडे होते ज्वारी, गहू ,बाजरीची पोती घरामध्ये होती. ती संपूर्णपणे जळून गेली आहे .शिलाई मशीन, वॉशिंग मशीन, टीव्ही,  या सर्व वस्तू व शेती उपयोगी साहित्य आगीत भस्मसात झालेले आहेत.

दुपारच्या वेळी गोठ्यामध्ये गाय बांधलेली होती .ती जवळजवळ 70 ते 80 टक्के भाजलेले आहे. घराशेजारी कोंबड्यांचे खुऱ्हाडे होती. त्यात 70 ते80 कोंबड्या होत्या .त्या कोंबड्या ही पूर्णपणे जुळवून मृत्यू पावलेले आहेत .घरामध्ये स्वयंपाकाची गॅस टाकी होती. आगीने तिचा स्पोट झाल्याने आगीने रुद्ररूप  घेतल्याने संपूर्ण घर हे काही वेळेतच संपूर्ण जळाले गेले. अशावेळी घरातील सर्व माणसे घराबाहेर असल्याने मनुष्यहानी झालेल नाही .परंतु घरातील सर्व वस्तू , साहित्य व संपूर्ण घर जळाल्याने जवळजवळ चार ते पाच लाखाची नुकसान झालेले आहे 

यावेळी ही बातमी वाऱ्यासारखी पसरली.  जुन्नर तालुक्याचे आमदार श्री अतुल शेठ बेनके आपल्या सहकाऱ्यांबरोबर दिनांक 15 -10 -2014 रोजी घटनास्थळी पोहोचले . श्री गोपीनाथ बोर्हाडे यांच्याशी चर्चा करून झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. घटनाही फार भयंकर घडलेली आहे .यासाठी सर्व समाजाने त्यांना आधार दिला पाहिजे.असे आवाहन केले.

यावेळी अनेक लोकांनी आपापल्या पद्धतीने कपडे , पैसे या स्वरूपात मोठ्या प्रमाणात मदत केलेली आहे .अशा वेळी जुन्नर तालुक्याचे आमदार श्री अतुल शेठ बेनके यांनी स्वतः या कुटुंबाला 50 हजार रुपये रोख मदत केली तसेच घर उभे करण्यासाठी व आर्थिक मदत  मिळवून देण्याचे आश्वासन दिलेले आहे