Ticker

6/recent/ticker-posts

ग्रामपंचायत कामगार सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी जे.के. काळे यांची निवड

 छायाचित्र _ वर्धनगड येथे नुतन जिल्हा कार्यकारिणीची निवड करताना राज्य संघटनेचे अध्यक्ष व इतर मान्यवर (छायाः प्रकाश राजेघाटगे


बुध  , दि.  (प्रकाश राजेघाटगे)-

 तडवळे ता. खटाव येथील ग्रामपंचायत लिपिक जालिंदर काळे [जे .के. ] यांची सर्वानुमते जिल्हा ग्रामपंचायत कामगार संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. वर्धनगड येथे महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार संघटनेची बैठक राज्य अध्यक्ष विलास कुमरवार यांचे मार्गदर्शनाखाली राज्य उपाध्यक्ष राजन लिगाडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली या वेळी, या वेळी जिल्हा कार्यकारिणीची निवड करण्यात आली जिल्हाअध्यक्षपदी जे.के. काळे, उपाध्यक्षपदी अमोल सनस, जीवन नांदे, संतोष झणझणे अमोल काळोखे, कार्याध्यक्षपदी रमेश भोसले, सचिवपदी सचिन मोरे, खजिनदारपदी गणपत फडतरे, सहसचिव तुषार कुंभार, जिल्हा मार्गदर्शक

प्रभाकर नेवसे, महिला आघाडीच्या पदी वैशाली गोरे, मीना कदम, वर्षा जाधव, जयश्री भोसले यांची निवड करण्यात आली. तर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख म्हणून गोरख मदने, वैभव कणसे, लक्ष्मण भिसे, रामदास वाघचौरे, तुषार सणस, ग्यानेंद्र पाटणे, जावेदभाई पठाण व प्रशांत साळुंखे यांची निवड करण्यात आली. यावेळी नवनियुक्त जिल्हा अध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर काळे म्हणाले की, सर्व तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी यांना सोबत घेऊन संघटना बळकट करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करुन, कामगारांच्या जिल्हा पातळीवरील अडीअडचणी सोडविण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने प्रयत्न

करु असे काळे म्हणाले. या निवडीनंतर सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांनी राज्य संघटनेशी प्रामाणिक राहून एका छताखाली काम करण्याची ग्वाही दिली. या नुतन कार्यकारणीचे राज्य अध्यक्ष विलास कुमरवार, दयानंद एरंडे, जनार्दन मुळे, दिलीप कोळसे, रेखा डेरवणकर तसेच राज्य कार्यकारिणीच्या आदी सदस्यांनी सर्वांचे अभिनंदन केले.