Ticker

6/recent/ticker-posts

राष्ट्रवादी आंदोलनानंतर खड्डा बुजवला



नाशिक । प्रतिनिधी / अमन शेख,

त्रिमूर्ती चौक ते कामटवाडादरम्यान मुख्य रस्त्यावर तीन तेचार फुटाचा खड्डा असून गेले १५ दिवसापासून मनपाअधिकाऱ्यांनी त्यावर लोखंडी गज व बॅरिकेट्स लावल्यानेराष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे आंदोलन करण्यातआल्याने महापालिकेने त्याची तत्काळ दाखल घेत सदरहूखड्डा बुजवला.त्रिमूर्ती चौक ते कामट वाडा या रस्त्यादरम्यान तीन ते चारफुटांचा खड्डा गेल्या पंधरा दिवसांपासून असून त्यावर लोखंडे बॅरिकेट्स लावल्यामुळे दोन जण अपघात होता होता वाचलेहोते. हा प्रकार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे नेतेव पदाधिकारी यांना समजताच त्यांनी या ठिकाणी धाव घेतअधिकाऱ्यांना धारेवर धरले. 

२४ तासात खड्डा दुरुस्त नझाल्यास गाठ आमच्याशी आहे, असा इशारा ओबीसी सेलउत्तर महाराष्ट्र अध्यक्ष छबू नागरे यांनी दिला होता. यावेळीप्रसिद्धी प्रमुख दर्शन लढ्ढा, नवीन नासिक विभाग प्रमुख विजयमटाले, युवक अध्यक्ष विकी डहाळे, समीर गोसावी, ओममटाले, कृष्णा पवार, अमोल पाटील, बंटी शेळके यांनीआंदोलनात सहभाग घेतला. त्यानंतर महापालिका प्रशासनाने त्याची दाखल घेत तत्काळ हा खड्डा बुजवला.