नाशिक ,प्रतिनिधी , अमन शेख
आडगाव गुन्हे शोध पथकाची कामगिरी. बेकायदेशीर रित्या देशी बनावटीचे पिस्टल बाळगणाऱ्या सराईतास जेरबंद करण्यास आडगाव गुन्हे शोध पथकास यश मिळाले आहे. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस करीत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिक शहरात वाढती गुन्हेगारी बघता सराईत गुन्हेगारांचा शोध घेऊन जेरबंद करणे. तसेच शस्त्र बाळगणाऱ्या वर कारवाई करण्याचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी संबधित पोलिस ठाण्यांना आदेशित केले होते. सोमवार (दि.३०) रोजी आडगाव गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी पोलिस ठाणे हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार निखिल वाघचौरे यांना गुप्तबातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, आडगाव पोलीस ठाणे रेकॉर्ड वरिल संशयित सुरज कांतीलाल वर्मा हा देशी बनावटीचे कट्टा घेऊन जनार्दन स्वामी मठाचे मागील गेट जवळील वडाचे झाडा खाली असलेल्या मारुती मुर्ती जवळून तपोवन नाशिक येथे येणार असल्याची समजली. तेवाच वेल प्रासंग गाथुन गुन्हेगराला पाकडन्यात यश आले .





Social Plugin