Ticker

6/recent/ticker-posts

आझाद फौंडेशनच्या वतीने समाधी आंदोलन


 प्रमाणात संततधार पाऊस झाला त्यामुळे जिल्ह्यातील बाळापूर ~ तेल्हारा तालुक्यातील शेतकऱ्यांचे सोयाबीन - कपाशी या पिकांसह अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, कपाशी पिकाची वाढ खुंटली असून टीचभर अवस्थेत कपाशी पिक आहे तर सोयाबीन पिक वांझोटे झाले आहेत, वाढलेल्या सोयाबीन ला शेंगाच नसल्यामुळे बाळापूर तेल्हारातील शेतकऱ्यांच्या पुढे प्रपंचाचा पुढील उदरनिर्वाह कसा करायचा हा यक्ष प्रश्न आ वासून उभा ठाकला आहे, आस्मानी संकट असतानाही शासनाच्या नियमानुसार पावूस न आल्यामुळे जिल्ह्यातील बाळापूर आणि तेल्हारा तालुक्यातील शेतकऱ्यांना सुलतानी संकटाला सुद्धा तोंड द्यावे लागत आहे,

         याच अनुषंगाने आजचे समाधी आंदोलन असून खालील प्रमाणे प्रमुख मागण्या आहेत,

१) तात्काळ "ओला दुष्काळ" जाहीर करण्यात यावा,

२)कुठलेही नियम निकष न लावता सरसकट कर्जमाफी करण्यात यावी,

३) १००% पिक विम्याचा लाभ तात्काळ कुठलेही नियम निकष न लावता देण्यात यावा,

४) सन २०२० मध्ये मंजूर झालेला खरीप हंगामाचा बाळापूर तालुक्यातील १८ हजार शेतकऱ्यांचा पिक विमा तात्काळ देण्यात यावा,

५) मागील वर्षीचा रब्बी हंगामाचा पिक विमा कंपनीला देण्यास बाध्य करावे.

          इत्यादी मागण्यासाठी आज आजाद फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गोपाल पोहरे व संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष देवानंद साबळे यांच्या नेतृत्व जोगलखेडे परिसरातील शेतकऱ्यांनी जिवंत समाधी आंदोलन केले यावेळी गावातील  शेतकरी माणिकराव भरणे रवि गावंडे योगेश हागे मनोज लांडे श्रीकांत भरणे राम भरणे संदीप भरणे संतोष भरणे शेकडो अनेक शेतकरी उपस्थितीत होते...