प्रतिनिधी- किसन भुतांबरे -ओतूर
जुन्नर तालुक्यातील ओतूर गावचे व तालुक्याचे माजी आमदार स्वर्गीय श्रीकृष्ण तांबे व स्वर्गीय माजी आमदार लत्तानानी तांबे यांचा बुधवार दिनांक 2 -10- 2024 रोजी स्मृतिदिन साजरा करण्यात आला यावेळी जुन्नर तालुक्याचे आमदार श्री अतुलशेठ बेनके कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या कार्यक्रमास माजी आमदार श्री बाळासाहेब दांगट श्री माजी आमदार श्री शरददादा सोनवणे. जिल्हा परिषद पुणेचे सदस्य मोहितशेठ ढमाले. श्री अनंतराव चौगुले ,श्री रमेश डुंबरे श्री तुषार शेठ थोरात . धनंजय डुंबरे व ओतूर गावचे सरपंच सौ छाया तांबे ,श्री वैभवशेठ तांबे, ग्राम विकास मंडळ ओतुरचे अध्यक्ष श्री अनिलशेठ तांबे ,श्री किशोर तांबे ,श्री राजेंद्र तांबे, श्री माधवराव डुंबरे .श्री अमोल डुंबरे, श्री प्रतीक अकोलकर ,जुन्नर तालुक्यातील अनेक सामाजिक, राजकीय ,शैक्षणिक क्षेत्रातील कार्यकर्ते उपस्थित होते .
यावेळी जुन्नर तालुक्याचे आमदार श्री अतुलशेठ बेनके म्हणाले की 1970 पासून स्वर्गीय श्रीकृष्ण तांबे आणि राष्ट्रीय नेते श्री शरदचंद्र पवार साहेब यांनी एकत्रितपणे विधानसभेत काम केलेले होते, जुन्नर तालुक्यातील पहिले सभापती होण्याचा मान माजी आमदार श्रीकृष्ण तांबे यांना मिळाला होता जुन्नर मधील कुकडी प्रकल्पाचे त्यांनी महत्त्वाची कामे केलेली आहेत,1972साली जुन्नर चे आमदार होण्याचा मान स्वर्गीय आमदार श्रीकृष्ण तांबे यांना मिळाला होता .संपूर्ण जुन्नरच्या सर्व समाजाची त्यांनी सेवा केली आहे, त्यांनी आदिवासी वाड्यावस्त्यापासून कामाची सुरुवात केली ,
ग्रामविकास मंडळ ओतूर ही संस्था स्थापन करून सर्वांसाठी शिक्षण सुरू केले यामध्ये गरीब श्रीमंत कोणताही भेदभाव न करता सर्वांसाठी शिक्षण सुरू केले. हे करत असताना सामाजिक कार्यकर्ता 26 सप्टेंबर 1973 रोजी त्यांचे निधन झाले स्वर्गीय श्रीकृष्ण तांबे यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी स्वर्गीय लता नवीन तांबे यांना जुन्नर तालुक्यांनी बहुमताने निवडून दिले ,आपल्या पतीचे राहिलेले कामे पूर्ण करण्याची त्यांनी जणू काही शपथ घेतली होती .सर्व समाजातील आरोग्य, वीज, पुरवठा .स्वच्छता. पाणीपुरवठा. रस्ते .शिक्षण, रोजगार यावर त्यांनी भर देऊन सामाजिक कार्य फार मोठ्या प्रमाणात केले
सर्व जनतेच्या सुखदुःखात सहभागी होऊन त्यांनी समाजाची सेवा केली. या सामाजिक कार्यकर्ता यांचे निधन हे 29 मे 2019 रोजी झाला, आशा या स्वर्गीय श्रीकृष्ण तांबे आणि स्वर्गीय लता नानी तांबे यांचे स्मृती दिन दरवर्षी साजरा केला जात असतो, परिसरातील मोठ्या प्रमाणामध्ये नेतेमंडळी सामाजिक कार्यकर्ते व त्यांना मानणारा समाज हा उपस्थित होता.
स्वर्गीय श्री कृष्ण तांबे.स्मृतिदिन आणि स्वर्गीय लतानानी तांबे यांचे स्मृतिदिनी निमित्त जमलेल्या सर्व समाजाचे आभार मानण्यात आले व शेवटी, अशा स्मृतीदिनानिमीत्त प्रदीप गाढवे यांनी कार्यक्रम संपन्न झाल्याची जाहीर केली





Social Plugin