Ticker

6/recent/ticker-posts

केंद्रीय आरोग्य विभाग पथकाची ग्रामीण रुग्णालयाला भेट



राजकुमार चिंचोळकर 

बाळापुर

 केंद्रीय आरोग्य विभागाच्या पथकाने बाळापुर येथील ग्रामीण रुग्णालयात दिनांक 28 नोव्हेंबर रोजी भेट देऊन आढावा घेतला सी आर एम केंद्र सरकार आरोग्य विभाग पथकाने भेट देऊन येथील ग्रामीण रुग्णालयात तसेच रुग्णांलयांच्या अंतर्गत पुरविण्यात येत असलेल्या तसेच उपलब्ध असलेल्या सुविधा रुग्णांना कशा प्रकारे पुरविण्यात येतात या बाबतीत त्याचप्रमाणे रुग्णालयात आवश्यक  सुविधा उपलब्ध करणेबाबत सविस्तर माहिती घेऊन आढावा घेतला आहे  ग्रामीण रुग्णालयामधील आरोग्य विभागामध्ये कमतरता असलेल्या कर्मचाऱ्यांची माहिती जाणून घेण्यात आली.

 तसेच बाळापूर ग्रामीण रुग्णालयामध्ये   20 अशा सेविकांची गरज असल्याची  माहिती ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ रिज़वाना खान  यांच्या कडून देण्यात आली सी आर एम केंद्र सरकार आरोग्य विभाग यांच्या पथकाने ग्रामीण रुग्णालयातील ऑक्सिजन प्लांट औषधी भंडार सामान्य रुग्णालय वार्ड तसेच आरोग्य विभागाच्या ॲम्बुलन्स यांची पूर्ण तपासणी करून पूर्ण माहिती जाणून घेतली तसेच तेथील कर्मचाऱ्यांची पूर्णता माहिती जाणून घेतली त्या विभागाच्या टीमचे श्रीकृष्ण वासुदेव सोनवणे यांनी एचआयव्ही वर कविता सादर करून मन जिंकले तसेच आलेल्या सर्व टीमचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले