Ticker

6/recent/ticker-posts

ऊसदर जाहीर करा अन्यथा रस्त्यावर उतरू - प्रताप जाधव



बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ] 

जिल्ह्यातील कारखाने राजरोसपणे सुरू होऊन एक महिना झाला तरी या  कोणत्याही प्रकारचा दर जाहीर न करता निवडणुकीच्या धामधुमीचा फायदा घेऊन शेतकऱ्याची कारखान्याच्या कडून फसवणूक होत आहे असे दिसत आहे

 जिल्ह्यात झालेल्या निवडणुकीमध्ये बहुतांश कारखाने सर्व आमदारांचे आहेत शेतकऱ्यांची खोटी सहानभूती घेऊन शेतकऱ्यांची फसवणूक दराच्या माध्यमातून होत आहे हे गेल्या वेळी शिवसेनेने तीव्र आंदोलनाच्या माध्यमातून कारखान्यांना जाब विचारला .गेल्या वेळेस या आंदोलनाचा विषय गांभीर्याने घेत जिल्हाधिकारी साहेबांनी नियोजन भावनांमध्ये मध्ये सर्व कारखान्यांची व सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती व ऊसदरा संदर्भात चर्चा केली होती त्याचप्रमाणे याही वेळेस जिल्हाधिकारी साहेब यांनी तात्काळ सर्व कारखान्यांच्या व्यवस्थापकांची बैठक घेऊन ऊस दरासंदर्भात चर्चा करावी व तो जाहीर करावा 

शिवसेना शेतकऱ्यांच्या सोबत असून पाच हजार रुपये दर या मागणीसाठी  शिवसेना आग्रही असून या लढ्यास शेतकऱ्यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता पाळबळ दयवे असे आवाहन करण्यात येत आहे कारखानदारांनी याविषयी गांभीर्याने घ्यावा अन्यथा  शिवसेना कारखान्यांच्या गाड्या आडवेल असा इशारा शिवसेनेचे युवा नेते प्रताप जाधव यांनी दिली आहे