प्रतिनिधी मयूर वाव्हळ
दर वर्षी प्रमाणे ह्या ही वर्षी दत्त जयंती निमित्त अखंड नाम जप तप यज्ञ सप्ताह 9 डिसेंबर 2024 ते 16 डिसेंबर 2024 पर्यंत श्री स्वामी समर्थ सेवा अध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र (दिंडोरी प्रणित) संभाजीनगर, पाचोड रोड, अंबड ता. अंबड जि. जालना येथे आयोजित करण्यात आला आहे
यज्ञसप्ताहचे वेळापत्रक खालील प्रमाणे रविवार दि. ०८/१२/२०२४ ग्रामदेवता निमंत्रण, मंडल मांडणी सोमवार दि. ०९/१२/२०२४ मंडल स्थापना, अग्निस्थापना, स्थापीत देवता हवन, नित्य स्वाहाकार मंगळवार दि. १०/१२/२०२४ नित्य स्वाहाकार, श्री गणेशयाग, मनोबोध याग बुधवार दि. ११/१२/२०२४ नित्य स्वाहाकार, श्री गिताई याग गुरूवार दि. १२/१२/२०२४ नित्य स्वाहाकार, श्री स्वामी याग शुक्रवार दि. १३/१२/२०२४ नित्य स्वाहाकार, श्री चंडी याग शनिवार दि. १४/१२/२०२४ नित्य स्वाहाकार, रूद्र याग, मल्हारी याग रविवार दि. १५/१२/२०२४ नित्य स्वाहाकार, बली पुर्णाहुती व दुपारी १२.३९ श्रीदत्त जन्मोत्सव होईल. 16.12.2024 रोजी महाप्रसाद चे आयोजन करण्यात आले आहे.
सर्व स्वामी सेवेकरी नी जास्तीत जास्त संख्येने पारायणला बसावे असे आवाहन केंद्र प्रमुख श्री. बाराहते सर, श्री.शिंदे सर, श्री.नितीन राऊत,श्री सुरेश सवासे ,सुनील लीपने यांनी केले आहे..





Social Plugin