Ticker

6/recent/ticker-posts

संविधान सन्मान सुरक्षा संवर्धन महा जनजागरण अभियान



कैलास कोल्हे @ग्रामीण प्रतिनिधी 

मंठा:  मूलनिवासी संघ, जिल्हा जालना व पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक, जिल्हा जालना यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय संविधान सन्मान सुरक्षा संवर्धन महा जनजागरण अभियान अर्थात बी एस फोर अभियानास मंठा येथून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकास अभिवादन करुन प्रारंभ कऱण्यात आला.

दिनांक 26 नोव्हेंबर 2024 रोजी 75 वा भारतीय संविधान दिवस मंठा तालुका येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारका समोर साजरा करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज व भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करुन उपस्थिताना मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्रीय संघटन सचिव माननीय एम बी मगरे, यांच्या हस्ते करण्यात आले. मा. एम बी मगरे म्हणाले की डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले आहे की जागृतीचा हा अग्नी अखंड तेवत ठेवा एखाद्या देशाची घटना कितीही चांगली असेल श्रेष्ठ असेल तरी त्याचा वापर करणारे लोक त्यास, राबवणारे लोकांचे हात कसे आहेत म्हणजे त्यांची मानसिकता त्यांची नीतिमत्ता कशी आहे हे त्यावरच निर्भर असते. जर एखादी राज्य घटना वाईट असेल परंतु तिचा वापर करणारे तिला राबवणारे लोक चांगले असतील तर ती घटना सर्वश्रेष्ठ घटना ठरेल. भारताचे संविधान हा नुसते कागदी दस्तावेज नसून 85 टक्के मूलानिवासी बहुजन समाजाच्या महामानवांच्या तथा छत्रपती शिवरायांच्या स्वप्नातील स्वराज्य निर्माण करण्याचा हा दस्तावेज, भारतीय संविधान हे संपुर्ण भारतीयांच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा आहे. 

या संविधानाचा आम्ही भारतीय लोकांनी सन्मान केला पाहिजे त्याची सुरक्षा केली पाहिजे व त्याचे संवर्धन केले पाहिजे हीच महामानवांना खरी आदरांजली ठरेल. या भारतीय संविधानचा प्रचार प्रसार करण्यासाठी मूलनिवासी संघाच्या माध्यमातून संपूर्ण मंठ्यामध्ये भारतीय संविधान सन्मान सुरक्षा संवर्धन या अभियानाच्या माध्यमातून भारतीय संविधाना विषयी 365 दिवस जनजागृती अभियान राबवण्यात येणार आहे. तरी या अभियानाचा मंठ्यातील नागरिकांनी, गावकऱ्यांनी, विद्यार्थी, युवक, महिला व अबाल वृद्धानी प्रचंड लाभ घ्यावा व आपले कल्याण साधावे व या अभियानात सक्रीय सहभागी होऊन या अभियानात मोठ्या संख्येने सामील व्हावे असे आवाहन  त्यांनी यावेळी केले. मूलनिवासी संघातर्फे राबविण्यात येणाऱ्या या अभियानास नागरिकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. या कार्यक्रमाचे संचलन जिल्हा अध्यक्ष शिवलाल अक्षय यांनी केले तर उपस्थित सर्व पाहुण्यांचे आभार माननीय आसाराम सखाराम राठोड यांनी आभार व्यक्त केले.यावेळी शिवलाल अक्षय, अध्यक्ष पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक जिल्हा जालना, आसाराम सखाराम राठोड उपाध्यक्ष पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक जिल्हा जालना तथा अध्यक्ष पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक, मंठा. यांनी समाजामध्ये जाऊन चौका चौका मध्ये छोटे छोटे कार्यक्रम घेऊन भारतीय संविधान सन्मान सुरक्षा संवर्धन तथा भारतीय संविधानातून दिलेले मूलभूत अधिकार नागरिकांना दिलेली अधिकार लोकांना समजावून सांगितले यावेळी मूलनिवासी संघाचे व संविधान जनजागृती संघाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.