गुणवंत राठोड कारंजा प्रतिनिधी :
डिग्रस-दरव्हा-नेर मतदारसंघाचे आमदार संजय भाऊ राठोड हे 2004 ते 2024 पर्यंत डिग्रस-दारव्हा नेर मतदारसंघातून सलग पाचवेळा आमदार म्हणून निवडून येणारे बंजारा समाजाचे एकमेव आमदार आहेत. त्यामुळे त्यांना उपमुख्यमंत्री पद मिळावे अशी मागणी बंजारा समाजाच्या वतीने केली आहे.
सन 2004 साली कै. बाळासाहेब ठाकरे यांनी आ. संजय राठोड यांच्यावर विश्वास दाखवला होता. आ. राठोड हे 20% राजकारण आणि 80 समाजकारणाच्या जोरावरच सलग पाचवेळा आमदार झाले आहेत. 2009 साली सर्वाधिक मतांनी येणारे बंजारा समाजाचे एकमेव आमदार ठरले तर नुकत्याच झालेल्या 2024 विधानसभा निवडणुकीत यांना 51000 हजार मतांनी पराभव केला आहे. महाराष्ट्र मधील बंजारा समाज सर्वाधिक जास्त संजय भाऊ राठोड यांच्या मागे आहे त्यामुळे संजय राठोड यांना उपमुख्यमंत्री पद मिळावे अशी मागणी राज्यातील बंजारा समाजाच्या वतीने यांनी केली आहे.





Social Plugin