कृष्णा पवार @ग्रामीण प्रतिनिधी नाशिक.
दिंडोरी दि.20-12-24 परनॉड रिकार्ड इंडिया फाऊंडेशन, चाईल्ड सव्हाईवल इंडिया दिंडोरी, ग्रामपंचायत कोल्हेर यांच्या संयुक्त विद्यमाने त्वचा रोग तपासणी शिबिर वार शुक्रवार या दिवशी वेळ 10.00 ते 1.00 वाजेपर्यंत 54 नागरिकांनी तपासणी करून घेतली या प्रसंगी त्यामध्ये कोल्हेर 2 गावातील आशा सेविका प्रमिला हडस, संगिता पवार ,आणि चाइल्ड सर्व्हायव्हल इंडिया दिंडोरी चे सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक नितीन वानखडे , मेडिकल ऑफिसर डॉ. अनुजा जाधव, फार्मासिस्ट ऋषिकेश गावंडे,आरोग्य शिक्षक तुषार साबळे , महिमा सोनवणे, डाटा ऑपरेटर निशा पवार आणि देविदास निकम तसेच त्वचारोग तपासणी साठी दिंडोरी येथील त्वचारोग तज्ञ, केशविकार तज्ञ, सौंदर्यशास्त्र तज्ञ डॉ. स्नेहलकुमार एस नवले (MBBS D.D.V Mumbai), व आदी कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.





Social Plugin