नागपूर मध्ये राष्ट्रीय बंजारा परिषदच्या वतीने गोर बंजारा समाजाचे नेते कॅबिनेट मंत्री मा.संजयभाऊ राठोड व राज्य मंत्री मा. इंद्रनील नाईक यांचा सन्मान करून शुभेच्छा देण्यात आले
गुणवंत राठोड कारंजा प्रतिनिधी
नागपूर - गोर बंजारा समाजाला महायुती मध्ये एक कॅबिनेट मंत्रीपद व एक राज्यमंत्री मिळाले आहे. समाजाचे प्रतिनिधित्व करून समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणारे गोर बंजारा समाजाचे नेते कॅबिनेट मंत्री मा.संजयभाऊ राठोड व राज्यमंत्री मा.इंद्रनील नाईक यांचे राष्ट्रीय बंजारा परिषदच्या वतीने गोर बंजारा समाजाचे पीठाधीश्वर विधान परिषद आमदार प.पू.बाबूसिंग महाराज ,धर्मगुरू जितेंद्र महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रीय बंजारा परिषदचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.विलासभाऊ राठोड तसेच महासचिव व भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य ऍड.पंडीतभाऊ राठोड व इतर पदअधिकारी कार्यकर्ते यांनी नागपूर अधिवेशना मध्ये स्वागत सत्कार करू शुभेच्छा दिल्या. नेहमीच राष्ट्रीय बंजारा परिषद संघटना समाजाच्या विकासासाठी व समाजात काम करणाऱ्या नेत्यासाठी त्यांच्या सोबत राहून त्यांना पाठबळ देण्याचे काम करत असते . बंजारा समाजाला कॅबिनेट व राज्यमंत्री व एक विधान परिषद आमदार महायुती मध्ये संधी मिळाल्याने गोर बंजारा समाजाचा विकास तुमच्या हातून घडेल अशी अपेक्षा व्यक्त केली. व राष्ट्रीय बंजारा परिषदच्या नवनिर्वाचित पद अधिकारी यांच्या सोबत बैठक घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आली.
या वेळी राष्ट्रीय बंजारा परिषदचे करतार भाऊ राठोड, सुदाम भाऊ राठोड, व नवनिर्वाचित पद अधिकारी नागपूर येथील स्थानिक प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





Social Plugin