तालुका प्रतिनिधी मयूर वाव्हळ
राजूर. जालना संकट चतुर्थीनिमित्त जालना जिल्ह्यातील जागृत तीर्थ क्षेत्र राजूर येथील श्री राजुरेश्वर गणपती मंदिरात भाविकांनी राजुरेश्वर संस्थानला 9 लाख 40 हजार 126 रुपयांचा देणगी प्रसाद दिल्याची माहिती गणपती संस्थानकडून देण्यात आली आहे.
बुधवार 18 डिसेंबर रोजी संकष्टी चतुर्थी असल्याने राज्यभरातील भाविकांनी मंदिरात दिलेला प्रसाद आज 19 डिसेंबर रोजी मोजण्यात आला. ज्यामध्ये संकष्टी चतुर्थीनिमित्त संस्थेला 43 हजार 228 रुपयांचा अभिषेक, 24 हजार 941 रुपयांचा सुबक संगमरवरी आसन नैवेद्य, 38 हजार 577 रुपयांची श्रीहुंडी देण्यात आली 4 लाख 4 हजार 80 रुपये, बांधकामासाठी 2 लाख 67 हजार 800 रुपये आणि गणपती संस्थानला 1 लाख 61 हजार 500 रुपयांचा प्रसाद मिळाला. यावेळी एकूण 9 लाख 40 हजार 126 रुपयांचा प्रसाद प्राप्त झाला आहे. चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी राजुरेश्वर मंदिरात दानपेट्या उघडण्यात आल्या. यावेळी व्यवस्थापन समितीचे प्रशासक गणेश साबळे, छगन हळदे, अंकुश ठोकळ, ज्ञानेश्वर साबळे, जी.एन.तांगडे, प्रशांत दानवे, व्ही.आर.गरड, आर.आर.गायके, भीमराव बारावकर, सदाशिव नागवे, रावसाहेब खरात, लक्ष्मण फुके, एम.एम.वडगावकर आदी उपस्थित होते.
%20(1).jpeg)




Social Plugin