दुचाकी चोरुन नेतांना चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
अंबड तालुका प्रतिनिधी मयुर वाव्हळ-
शहरातील जालना-बीड मुख्य रस्त्यावर तहसिल कार्यालयासमोरील पाटील फायनान्स दुकानासमोर उभी असलेली महसूल सेवकाची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना काल बुधवारी (ता. १८) रात्री ७.४० वाजता घडली.यासंदर्भात अधिक माहिती अशी की, अंबड तहसील कार्यालयात कार्यरत असलेले महसूल सेवक सोमनाथ सरफळे हे आपली होंडा कंपनीची मोटर सायकल (एमएच २१ बिडी ०७४४) तहसील समोरील पाटील फायनान्स शॉपसमोर हँडल लॉक करून उभी करून कार्यालयीन कामासाठी दुपारी ३ वाजेच्या दरम्यान जालना येथे गेले होते.
काम आटोपून ते रात्री ८-३० वाजेच्या दरम्यान अंबडला परत आले असता त्यांना पाटील फायनान्ससमोर उभी केलेली आपली मोटर सायकल आढळून आली नाही. त्यामुळे त्यांनी इतरत्र आपल्या मोटर सायकलचा शोध घेतला मात्र त्यांना मोटर सायकलचा कुठेही सुगावा लागला नाही. त्यानंतर त्यांनी आपली मोटर सायकल चोरी गेल्याबाबत अंबड पोलीस स्टेशनला लेखी तक्रार दिली आहे.दरम्यान, मोटर सायकल चोर हा सायंकाळी ७:४० वाजता सदर मोटर सायकलचे हँडल लॉक तोडून मोटर सायकल स्टार्ट करून घेऊन जात असतांना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेचा अधिकारी तपास अंबड पोलीस करत आहेत.





Social Plugin