Ticker

6/recent/ticker-posts

गुटखा वाहतुक करणारे वाहनासह एक कोटीचा मुद्देमाल जप्त..


जालना, दि १३ (प्रतिनिधी) मयुर वाव्हळ

:- जालना जिल्ह्यात अवैध गुटखा वाहतुक व विक्री करणारे संबंधी माहिती घेऊन कारवाई करण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बसंल, यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. पंकज जाधव व पथकास सूचना दिल्या होत्या. त्यावरुन पोलीस निरीक्षक श्री. पंकज जाधव स्वागुशा यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा यांनी  वेगवेगळे पथक तयार करुन कारवाई करण्यासाठी मार्गदर्शन केले होते. 

त्या अनुषंगाने दिनांक १३/१२/२०२४ रोजी रात्री ०१.१० वाजेच्या सुमारास पोलीस ठाणे तालुका जालना हहह्मीत कंडवंची शिवरात समृध्दी महामार्गावर स्थानिक गुन्हे शाखा येथील पथक हे पेट्रोलिंग करीत असतांना त्यांना समृध्दी महामार्गाने मेहकर कडून छत्रपती संभाजीनगर कडे एक संशईत कंटेनर जातांना दिसले. पथकातील पोलीस अधिकारी व अमंलदार यांनी सदर कंटेनर थांबुन कंटेनर चालकाकडे विचारपुस केली असता, त्याने प्रथम उडवा उडवीचे उत्तरे दिली.त्यास अधिक विश्वासात घेऊन विचारपुस करता कंटेनर मध्ये गुटखा असल्याचे सांगितलने त्याने सांगितले.