Ticker

6/recent/ticker-posts

अंबड-घनसावंगी येथे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष सुरु होणार



..एकही गरजू रुग्ण उपचारांपासून वंचित राहणार नाही आमदार हिकमत उढाण यांचे आश्वासन..

घनसावंगी/प्रतिनिधी. मयूर वाव्हळ 

शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या धर्तीवर लवकरच अंबड आणि घनसावंगी येथे शिवसेनेचे स्वतंत्र वैद्यकीय मदत कक्ष सुरू होणार आहेत. या माध्यमातून आरोग्य शिबिरे आयोजित करून एकही गरजू रुग्ण वैद्यकीय सेवांपासून वंचित राहणार नाही, अशी घोषणा करण्यात आली आहे. या उपक्रमाचे नेतृत्व घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे आ. हिकमत उढाण करणार आहेत.आ. उढाण यांनी दि. १२ डिसेंबर रोजी कोपरी येथील शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या मुख्य कार्यालयाला भेट दिली आणि या कक्षाच्या कार्यप्रणालीची सविस्तर माहिती घेतली. या वेळी मंगेश चिवटे यांनी त्यांना शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कामकाज आणि शिवसेना आरोग्यदूत फाउंडेशनच्या उपक्रमांविषयी माहिती दिली. राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्य अखंडपणे सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आता या धर्तीवर अंबड आणि घनसावंगी येथे स्वतंत्र वैद्यकीय मदत कक्ष सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, या ठिकाणी नियमित आरोग्य शिबिरे भरवून रुग्णसेवा पोहोचवली जाणार आहे.