स्वयम शिक्षण प्रयोग संस्थेचे आयोजन
मालेगाव प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले
रोजी वाशिम तालुक्यातील पंचाळा या गावातील ग्रामपंचायत या परिसरात उत्सव समतेचा हा कार्यक्रम स्वयम् शिक्षण प्रयोग या संस्थे मार्फत मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. स्वयम् शिक्षणं संस्थेच्या वतीने वर्षा घुगे यांनी प्रास्ताविक भाषणात संस्थेची माहिती स्थापना संस्थेचे कार्य याची पद्धतशिर माहिती दिली .स्वयंम् शिक्षण प्रयोग ही संस्था ग्रामीण भागात १९९३ पासून कार्यरत आहे.संस्था सात राज्यात महाराष्ट्र,केरळ ,बिहार,ओडिसा, आसाम,कर्नाटक ,गुजरात,३२७४ पेक्षा अधिक गावामध्ये शाश्वत, शेती ,पोषण ,आरोग्य ,पाणी, स्वच्छता , उद्योजकता,विकास या विषायास अनुसरून कार्यरत आहे.
मालेगांव तालुक्यातील ५० गावे वाशिम तालुक्यातील ५० गावे असे ऐकून १०० गावामध्ये १० हजार महिला ६००० हजार शाळेतील विद्यार्थी सोबत स्त्री _ पुरुष समानता,पाणी आरोग्य ,पोषण,आणि स्वच्छता ,तसेच सेंद्रिय शेती ,गावं कृतीगट बळकटिकरण ई विषयावर काम करीत आहे.ग्रामपंचायत ला सोबत घेऊन लोक सहभागातून ग्राम आराखडा तयार करणे. याची माहिती प्रास्ताविक माहिती संस्थे च्या वतीनी वर्षा घुगे उपस्थित महिला गावकरी मंडळी यांना दिली.उत्सव समतेचा हा कार्यक्रम गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. व महिलांच्या आणि विद्यार्थांच्या अनेक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या .निबंध स्पर्धा,रांगोळी स्पर्धा,खुल जा सिम सिम ,अडथळ्यांची शर्यत साप सीडी , पाहुण्यांशी गप्पा , सेल्फी स्टॅन्ड अशा विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या.तसेच भरोड ,लोकगीते, कलापथक ,च्या माध्यमातून स्वच्छता, अभियान सार्वजनिक वैकतिक स्वच्छता , ई माहिती चा संदेश या कार्यक्रमाअंतर्गत देण्यात आला.
या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष पंचाळा ग्रामपंचायत चे सरपंच रहीम गवरे , उपसरपंच वंदना ताजने त्याच प्रमाणे शाळेचे मुख्याध्यापक संजय देशमुख ,केंद्र प्रमुख अशोक महाले ,ममता इंगोले ( शिक्षिका ) योगिता (शिक्षिका ) लक्ष्मी मोरे (शिक्षिका) ,डॉ . गाणबा थोरात ,डॉ मालती मॅडम, डॉ पूजा गोटे ,अंगणवाडी सेविका सिंधुबाई भालेराव , अंगणवाडी मदतनीस छाया मोरे त्याच प्रमाणे स्वयम् शिक्षणं प्रयोग संस्थेचे जिल्हा समनव्यक काकासाहेब आडसुळे ,तालुका समनव्यक आकाश पट्टेबहादूर.आरोग्य सखी कुसुम मोरे ब्लॉक कोडीनेटर विजय सेगर उपस्थित होते.
स्वयम् शिक्षण प्रयोग संस्थे च्या वतीने कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वर्षा घुगे (मास्टर ट्रेनर) ,शायका परवीन (मास्टर ट्रेनर) , यांनी या कार्यक्रमाचे आयोजन नियोजन व परिश्रम घेतले.व तसेच आभार शायका परवीन (मास्टर ट्रेनर) यांनी केले.





Social Plugin