Ticker

6/recent/ticker-posts

अंबड येथे ओबीसी समाजाचे आंदोलन छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान नाकारले.



अंबड/प्रतिनिधी. मयूर वाव्हळ 

ओबीसी नेते तथा माजी उपमुख्यमंत्री छगनराव भुजबळ यांना महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात मंत्रिपद देण्यात आले नाही. त्यामुळे संपूर्ण ओबीसी समाजामध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. याचाच एक भाग म्हणून अंबड शहरामध्ये सकल ओबीसी समाजाकडून महायुती सरकारसह उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्याविरोधात धरणे आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला.यावेळी अंबड शहर व परिसरातील ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

संतप्त ओबीसी बांधवांनी यावेळी अजित पवार यांच्या प्रतिमेला जोडे मारले.यावेळी रवींद्र खरात, नंदू पुंड, राम लांडे, संदीप खरात, दिनेश गाजरे, डॉ. अभय जाधव, शिवा गाजरे, दिलीप राठोड, विजय खटके, सुभाष चाटे, किशोर मुर्तडकर, गोरख हिरे, संतोष राऊत, परमेश्वर राऊत, योगेश राऊत, ईश्वर पिराने, बाबासाहेब बटुळे, बाळू गावडे, बाळासाहेब दखणे, परमेश्वर भागवत, किरण रहाटगावकर, प्रदीप जीवने, कैलास गादे आदींची उपस्थिती होती.