Ticker

6/recent/ticker-posts

शेतकरी आत्महत्याप्रकरणी बँक व्यवस्थापकावर गुन्हा दाखल.


प्रतिनिधी मयूर वाव्हळ 

गोंदी (जि. जालना): अंबड तालुक्यातील करंजळा येथील शेतकरी कृष्णा विनायक आमटे (४०) यांनी आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास उघड झाली. एसबीआय बँकचे अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून होत असलेल्या कर्जाच्या तगाद्यामुळे कृष्णा आमटे यांनी आत्महत्या केल्याचा आरोप त्यांच्या नातेवाइकांनी केला आहे. नातेवाइकांनी बँक व्यवस्थापकावर गुन्हा दाखल

करण्याची मागणी करत तब्बल आठ तास मृतदेह गोंदी पोलिस ठाण्यात ठेवला. त्यानंतर रात्री ८ वाजेच्या सुमारास एसबीआय बँकेच्या महाकाळा येथील शाखा व्यवस्थापक गोविंद शिंदे तसेच वैभव दहीवाळ यांच्यावर गोंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कृष्णा आमटे हे रविवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास कोणाला काहीही न सांगता त्यांच्या शेतात गेले. बराच वेळ झाल्यानंतर ते परत आले नसल्याने त्यांचा शोध घेतला असता त्यांनी आत्महत्या केल्याचे आढळून आले.