Ticker

6/recent/ticker-posts

अंबड येथे श्री दत्त जयंती महोत्सव तीन दिवसीय उत्सवात दिग्गज कलावंत येणार.



प्रतिनिधी मयूर वाव्हळ 

 अंबड येथील दिवंगत श्री त्रिंबकराव जळगावकर यांनी सुरू केलेला आणि गायनाचार्य पंडित गोविंदराव जळगावकर यांनी स्वरसातत्याने जोपासलेला शतकपूर्ती दत्त जयंती संगीत महोत्सव येत्या १३, १४ आणि १५ या तीन दिवस आयोजीत करण्यात आला आहे. पाच सत्रात होणाऱ्या या शताब्दी महोत्सवात दिग्गज कलावंत सहभागी होणार आहे. या महोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे.अंबड नगरपरिषदेच्या गायनाचार्य पंडित गोविंदराव जळगावकर नाट्यगृहात होणाऱ्या या संगीतोत्सवाचा प्रारंभ शुक्रवारी (१३) रोजी सायंकाळी 6.30 नांदी गायनाने होणार आहे. त्यानंतर उद्घाटन समारंभ होईल. पहिल्या सत्राचा प्रारंभ शिवम तोडकर यांच्या सनई वादनाने होईल. त्यानंतर नागेश आडगावकर (पुणे) यांचे गायन, यशवंत वैष्णव (मुंबई) यांचे एकल तबलावादन, पार्वती दत्ता (छत्रपती संभाजीनगर) यांचे कथ्थक नृत्य होईल. तर पं. रोणू मुजुमदार (मुंबई) यांचे बासरीवादन आणि पं. उल्हास कशाळकर (मुंबई ) यांच्या गायनाने या सत्राचा समारोप होईल.

महोत्सवाच्या दुसरे सत्र शनिवारी (दि.१४) सकाळी नऊ वाजता नांदी गायनाने सुरू होईल. शंकर गिरी ( अंबड) यांचे गायन, नितीश पुरोहित (पुणे) यांचे सरोद वादन, डॉ. वैशाली देशमुख (छत्रपती संभाजीनगर) तसेच कुमार मर्डर (धारवाड) यांचे गायन होईल. तिसरे सत्र सायंकाळी साडेसहाला नांदीने सुरू होईल.