Ticker

6/recent/ticker-posts

महिला बंदींसाठी ब्युटी पार्लर कोर्स"



बुध  दि .[प्रकाश राजेघाटगे ] 

कारागृह विभागाचे अपर पोलीस महासंचालक प्रशांत बुरडे, विशेष पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर, उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांच्या मार्गदर्शनाने व आदेशाने सातारा जिल्हा कारागृहामध्ये ध्यास फाउंडेशन यांच्या माध्यमातून कारागृहातील महिलांसाठी 10 दिवसांचा बुटी पार्लर (व्यक्तिगत सौंदर्य संवर्धन) कोर्सची सुरुवात 2 डिसेंबर, 2024 रोजी झाली. या कोर्समध्ये महिला बंद्यांना थ्रेडिंग, फेशियल, ब्लिचिंग, हेअर कटींग, हेअर स्टाईल, क्लीन अप इत्यादीचे प्रशिक्षण व मार्गदर्शन केले जाणार आहे. कोर्सची सांगता 12 डिसेंबर 2024 ला होईल. या कोर्सला प्रशिक्षक म्हणून सौ सुप्रिया जाधव लाभल्या आहेत. सदर कोर्सचे उद्घाटन ध्यास फाउंडेशनच्या अध्यक्षा  सौ वैजयंती ओतारी आणि कारागृह अधीक्षक शामकांत शेडगे यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमास ध्यास फाउंडेशनच्या सदस्या ॲड. रोशना रुपनवर, वरिष्ठ तुरुंग अधिकारी ज्ञानेश्वर दुबे, महिला शिपाई ज्योती शिंगरे, माधुरी वायकर, गीता दाभाडे, रूपाली नलवडे, प्रशांत कदम इत्यादी उपस्थित होते.