Ticker

6/recent/ticker-posts

स्वखर्चाने विहाराचे बांधकाम करुन बुद्ध मूर्ती भेट



राजकुमार चिंचोळकर  बाळापूर 

:- समाजचे संघटन होऊन मुलांचा व समाज सुशिक्षित  होऊन  व विकासत्मक  व्हावा या उद्देशाने बाळापूर तालुक्यातील जयभीम नगर वाडेगाव येथे स्वखर्चाने विहार बांधून त्या विहारात  अष्टधातु असलेली तथागत भगवान बुद्धाची मूर्ती भेट दिली आहे 

         या करिता अकोला येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक बाबुराव खंडारे, शिक्षणा विस्तार अधिकारी नंदा खंडारे,ऍड विजय खंडारे व ऍड श्रेया  खंडारे यांनी पुढाकार घेऊन बुद्धाचा प्रसार होईल व समाज एकत्रित येईल या उद्देशाने गुरुवार रोजी सकाळी ९ वाजता वाडेगाव येथे महाथेरो भदंत ,समाज बांधव बुद्ध उपासक व महिला उपसिका यांनी सकाळी त्या ठिकाणी मूर्तीची स्थापना करून   त्रिशरण पंचशील घेऊन खीर वाटप करण्यात आली आहे.

    तसेच जयभीम नगर येथे मूर्तीची स्थापना करून या ठिकाणी  नेहमी सहकार्य राहिल असे उपस्थित जनसमुदाय ला सांगितले .तसेच  मूर्ती स्थापना करण्यासाठी  महाथेरो भदंत सुमंगल ,महाथेरो विनयपाल,महाथेरो आनंदबोधी,महाथेरो सुर्यकिर्ती,महाथेरो श्रीलाभ,भदंत धम्मानंद,संबोधि,शिलरत्न, श्रामनेर महानम,आदींची उपस्थिती लाभली तसेच

यावेळी दोन युवकांनी श्रामनेर दीक्षा देण्यात आली आहे.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  भीम नगर, पंचशील नगर, अशोक नगर, सिद्धार्थ नगर,जय भीम नगर आदी गावातील प्रतिष्ठित नागरी बौद्ध उपासक उपासक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहकार्य केले त्यामुळे या ठिकाणी यात्रेचे स्वरूप आले होते.