कैलास कोल्हे @ग्रामीण प्रतिनिधी
बदनापुर: दिनांक 10 डिसेंबर 2024 रोजी बदनापुर येथे दिशा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित, मातोश्री रमाई समाजकार्य महाविद्यालयात वतीने जागतिक मानव अधिकार दिवस साजरा करण्यात आला. यावेळी मातोश्री रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून जिजाऊ पब्लिक स्कूलचे श्री. मापारी सर उपस्थित होते, तर मार्गदर्शक म्हणून सिद्धार्थ पवार हे होते. सिध्दार्थ पवार सर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना जागतिक मानव अधिकार दिनाचे, वैश्विक मानवधिकाराची सनद व त्याचे महत्त्व पटवून दिले. या
कार्यक्रमाचे सुत्र संचलन समाजकार्य प्रथम विषयाचा विद्यार्थी पवन खारवणे यांनी केले, तर आभार प्रदर्शन रीना साबळे यांनी केले. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत व अभिनंदन करण्यात आले सदरील कार्यक्रम हा अत्यंत उत्साही व आनंदी वातावरणात पार पडला.





Social Plugin