पत्रकार:- मोहन जाधव.
रयत शिक्षण संस्थेचे मारुतीराव दगडूजी तिडके पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शालेय स्तरावरील गणित,विज्ञान व पर्यावरण प्रदर्शन दि.१३/१२/२०२४ रोजी उत्साहात संपन्न झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाचे प्राचार्य मांडवडे ए. आर. यांनी भूषविले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन मांडवडे ए. आर यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यालयाचे प्रभारी ,पर्यवेक्षक चंदने पी.आर. हे उपस्थित होते. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा तसेच सर्वत्र तंत्रज्ञान व आधुनिक साधनांची वाढती व्याप्ती व गरज पाहता अधिकाधिक संशोधन व नवनवीन शोध झाले पाहिजे त्यासाठी दरवर्षी विद्यालयात गणित विज्ञान व पर्यावरण प्रदर्शन आयोजित केले जाते. हे विज्ञान प्रदर्शन अत्यंत उपयुक्त असून विज्ञान संशोधन भविष्यासाठी नव्हे तर आज व आत्ताच्या काळाची गरज बनली आहे. असे मत विद्यालयाचे प्राचार्य मांडवडे ए.आर. यांनी याप्रसंगी व्यक्त केले. या प्रदर्शनात ४० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. लहान गटात प्रथम क्रमांक पायमोडे ऋषिकेश सतीष उपकरणाचे नाव टाकाऊ कचऱ्यापासून विद्युतनिर्मिती,द्वितीय क्रमांक सोनवणे पार्थ भारत उपकरणाचे नाव टाकाऊ वस्तूपासून सुक्ष्मदर्शक, आणि तृतीय क्रमांक कु.गाडे काव्या शैलेश उपकरणाचे नाव चांद्रयान तर
मोठया गटात प्रथम क्रमांक गौरव नरेंद्र आहेर उपकरणाचे नाव टेलीस्कोप, द्वितीय क्रमांक पवार सुयोग कैलास उपकरणाचे नाव पाणी पातळी दर्शक, तृतीय क्रमांक शेलार ओंकार गोरक्षनाथ उपकरणाचे नाव टाकाऊ वस्तूपासून सुक्ष्मदर्शक. विज्ञान प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व विज्ञान आणि गणित शिक्षकांनी प्रयत्न केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पारधे ए.एम.यांनी केले व शेवटी आभार गुरुकुल प्रमुख मोमीन आय.ए.के. यांनी मानले.





Social Plugin