बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]
विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन अंगी बाळगून समाज हिताच्या दृष्टीने नवनवीन संशोधन करून आपले जीवनमान उंचवावे. आजपर्यंत भारताच्या प्रगतीमध्ये वैज्ञानिकांचे योगदान मोलाचे आहे असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव बंडू पवार यांनी केले . हनुमान विद्यालय निढळ येथे संपन्न झालेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात बक्षीस वितरण कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते ..या कार्यक्रमासाठी संस्थेचे विभागीय अधिकारी नवनाथ जगदाळे ,स्कूल कमिटी सदस्य ॲड.किसनराव खामकर गटशिक्षणाधिकारी सौ. सोनाली विभुते, शिक्षण विस्तार अधिकारी सुतार सर गावचे प्रतिष्ठित नागरिक संतोष खुस्पे ,प्रशांत घाडगे ,हनुमंतराव यादव उपस्थित होते .या प्रदर्शनामध्ये प्राथमिक गटातून 71 उपकरणे व माध्यमिक गटातून 55 उपकरणांची नोंदणी करण्यात आली होती प्राथमिक गटातून
१विघ्नेश कालिदास फडतरे (श्री श्री विद्यालय ,औंध )कार्बन पासून शाईची निर्मिती प्रथम क्रमांक
२ सानिध्या संतोष सूर्यवंशी (श्रीराम विद्या मंदिर ललगुण ) वायरलेस पावर ट्रान्सफॉर्मर द्वितीय क्रमांक
३ आदित्य बाबुराव जाधव (गुरुवर्य काळंगे माध्यमिक विद्यालय, मोळ) सौर ऊर्जा वापर करून वनस्पती तणांचे नियंत्रण तृतीय क्रमांक
४ आर्या विशाल पडतरे (जि प प्राथमीक शाळा ,पळसगाव )एअर प्युरिफायर उत्तेजनार्थ क्रमांक
५ हर्षवर्धन अतुल कावरे (श्रीराम विद्यालय ,मासुर्णे) स्पायकर उत्तेजनार्थ क्रमांक
५ श्रीहरी सदाशिव गायकवाड (माध्यमिक विद्यालय , कटगुन) वुमन सेफ्टी उत्तेजनार्थ क्रमांक
✨माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यार्थी उपकरणे इयत्ता नववी ते बारावी
१ दीपेश चंद्रकांत फडतरे (राजा भगवंतराव जुनिअर कॉलेज, औंध) भाजीपाला व फळे क्लीनर प्रथम क्रमांक
२ सुरज सचिन कांबळे (हनुमान विद्यालय, निढळ) एअर इंजिन सायकल
द्वितीय क्रमांक
३ ऋषिकेश संजय लुकडे (भारतमाता विद्यालय ,मायनी) लँड स्लाईड प्रोटेक्टर तृतीय क्रमांक
४ शिवेंद्र अमितकुमार लावंड (श्री लक्ष्मीनारायण इंग्लिश स्कूल, खटाव) फॅक्टरी कार्बन फिल्टर
उत्तेजनार्थ क्रमांक
५ आदित्य संतोष ढोकळे (समाजभूषण हणमंतराव साळुंखे विद्यालय ,कलेढोण) पाणी पेट्रोल पासून घरगुती गॅस उत्तेजनार्थ क्रमांक✨दिव्यांग विद्यार्थी उपकरण नववी ते बारावी
१ एजाज सादिक मुल्ला (वेदावती हायस्कूल ,खातगुण) रूम हीटर प्रथम क्रमांक✨प्राथमिक शिक्षक माध्यमिक शिक्षक व प्रयोगशाळा सहाय्यक उपकरने
१ श्री सुपले भीमसेन रघुनाथ ( हनुमान विद्यालय निढळ )एड्स जनजागृती प्रथम क्रमांक
१ विठ्ठल हनुमंत भागवत (कमलेश्वर विद्यामंदिर ,विखळे) सूर्यग्रहण चंद्रग्रहण अभ्यासणे प्रथम क्रमांक
१निवृत्ती बाळू खराडे (जयराम स्वामी विद्या मंदिर ,वडगाव) मानवी श्वसन व उत्सर्जन संस्था प्रतिकृती प्रथम क्रमांक
२चव्हाण एस एल (हनुमानगिरी विद्यालय ,पुसेगाव)रेन वॉटर हार्वेस्टर द्वितीय क्रमांक
३संग्राम माने (भारतमाता विद्यालय व जुनिअर कॉलेज, मायनी) पवन ऊर्जा तृतीय क्रमांक .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक खटाव तालुका विज्ञान संघाचे अध्यक्ष श्री. संदीप त्रिंबके यांनी केले, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. जगदीश निर्मळ ,सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. कांबळे सर , सौ. गायकवाड मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. काटकर सर यांनी केले





Social Plugin