Ticker

6/recent/ticker-posts

डायरीया व नीमोनीया साठी ओ आर एस संजीवनी.



मालेगाव प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले 

   डायरीया व नीमोनीया रोखण्यासाठी ओ आर एस ही संजिवणी तर हात धूण्याने अनेक आजारावर नियंत्रण मिळविता येते. हाच संदेश पथनाट्या द्वारे व जनजागृती किन्हीराजा परीसरातील उमरदरी, कवरदरी, एरंडा, मैराळडोह, हनवतखेडा किन्हीराजा या गावातील शाळा ग्रामपंचायत व मुख्य चौकात पथनाट्याद्वारे जनजागृती करून जनतेला व विद्यार्थांना हात धुण्याचे फायदे सांगून नीमोनीया व डायरीया वर नीयंत्रन मिळविण्यासाठी ओआर एस हे संजीवनी असून याचा उपयोग नियमीतपणे केल्यास डायरीया व नीमोनीया वर योग्य नियोजन करण्यास मदत होते अशी माहिती यावेळी पथनाट्याद्वारे प्लॅन इंडिया च्या वतीने सेल्फ केअर ॲण्ड न्यु माॅम ॲण्ड किड्स च्या वतीने जनजागृती करण्यात आली .

   अनेक आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी मालेगांव तालुक्यातील व किव्हीराजा परिसरातील अनेक गावात आज  सेल्फ केअर फॉर न्यू मॉम अँड किड्स अंडर-5 प्रोजेक्ट अंतर्गत, प्लान इंडिया, रेकिट डेटॉल स्वास्थ्य बनेगा इंडिया, आणि स्वास्थ विभाग वाशिम यांच्या संयुक्त उपक्रमांतर्गत, ग्रामपंचायत उमरदरी करवदरी, एरंडा , मैराळडोह , किन्हीराजा , आणि हनवतखेडा या गावात डायरिया आणि न्यूमोनिया, सांस मोहीम या विषयावर विशेष पथनाट्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.     

     कार्यक्रमाची सुरुवात मनोरंजनाच्या माध्यमातून करण्यात आली, ज्यामुळे गावकऱ्यांचा मनोरंजक पद्धतीने उत्साह वाढेल आणि विषयातील त्यांची आवड निर्माण होईल. यानंतर नुक्कड नाटक टीमने डायरिया आणि न्यूमोनियाच्या उपचारासाठी ओआरएस आणि झिंक गोळ्यांचे महत्त्व पटवून दिले. डब्ल्यू एच ओ च्या स्वच्छते संदर्भातील सात सूत्री कार्यक्रमाची सविस्तर माहिती या नाटकाच्या माध्यमातून ग्रामस्थांना देण्यात आली. गुलाबी दीदी काजल राठोड यांनी निर्जलीकरण आणि ओ आर एस चा योग्य वापर करण्याचे प्रत्यक्षित करून गावकऱ्यांना शाळेतील विद्यार्थ्यांना हे समजावून सांगितले. त्यांच्या थेट प्रात्याक्षिकातून प्रेक्षकांना सोप्या आणि प्रभावी उपायांची माहिती दिली. कार्यक्रमादरम्यान स्थानिक सरपंच, उपसरपंच, शाळेतिल शिक्षक वर्ग, तसेच ग्रामस्थ महिला पुरुष, व शाळेतिल चिमुकले उपस्थित होते, कार्यक्रम दरम्यान प्लॅन इंडियाचे स्टेट मॅनेजर दिनेश प्रजापती, ब्लॉक मॅनेजर भूषण कोल्हे आणि विनोद उन्हाळे, गुलाबी दीदी, काजल राठोड आशा कार्यकर्ता,अंगणवाडी वसंतराव नाईक काॅलेज चे प्राचार्य दिलीप राठोड केन्द्र प्रमुख सुधाकर साखरे, शिवाजी शाळेच्या मुख्याध्यापिका आर एस खेडकर, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक विनोद गावंडे सह सेविका,ग्रामस्थ आणि संपूर्ण पथनाट्य संघाने कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.