Ticker

6/recent/ticker-posts

स्त्री मुक्ती दिन परीषदेचे आज आयोजन.



मालेगाव जावेद धन्नू भवानीवाले 

भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा वाशिम यांच्या मार्फत तक्षशिला बौद्ध विहार मालेगाव स्त्री मुक्ती दिनपरीषदेचे बुधवार ला आयोजन करण्यात आले आहे.बोधिसत्व ,महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 25 डिसेंबर 1927 ला महाड येथे महिलांच्या स्वातंत्र्यासाठी मनुस्मृती चे दहन केले होते.महिलांना आपले हक्क मिळवून देण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्त्री मुक्ती चा लढा दिला होता.या लढ्याच्या दिनानिमित्त भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा महिला आघाडी च्या मार्फत बुधवार दि. 25/12/2024 ला   दुपारी 01=00 वाजता स्त्री मुक्ती दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व महिलांनी व समता सैनिक दल महिला विभाग यांनी कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित राहावे असे महिला आघाडी मालेगाव शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.

     या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सविता खिल्लारे (भा.बौ. म. महिला आघाडी मालेगाव ता. अध्यक्ष ) असणार आहेत तर प्रमुख मार्गदर्शक वंदना गायकवाड ( तालुका अध्यक्षा मालेगाव, वंचित बहुजन आघाडी ,वैशालीताई गवई (समता सैनिक दल महिला विभाग मालेगाव),सुप्रियाताई सहस्त्रबुद्धे (संस्कार विभाग मालेगाव) असतील असे या स्त्रीमुक्ती दिन परीषदेचे निमंत्रक सागर इंगळे तालुका सचिव मालेगाव व सर्व तालुका कार्यकारिणीच्या वतीने शीला गायकवाड मेडशी सर्कल प्रमुख मालेगाव यांनी मालेगाव तालुक्यातील महिलांनी उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे.